BMW TEX5 New Car;उदयनराजेंच्या ताफ्यात ‘या’ नव्या गाडीची एन्ट्री; किंमत जाणून व्हाल अवाक्

छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज म्हणून ओळखले जाणारे,छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या स्टाइलचे महाराष्ट्रभर चाहते असल्याचे पाहायला मिळते. त्यांच्या कॉलर उडवण्याच्या स्टाईलचे तर हजारो दिवाने असून त्यांची ही स्टाइल अनेकांना भावते‌. उदयनराजे यांचे अनेक वेगवेगळे शौक आहेत. त्यापैकी एक म्हणजे गाड्यांचे शौक. उदयनराजे गाड्यांचे खूप मोठे शौकीन आहेत. त्यांची आणि त्यांच्या गाड्यांच्या कनेक्शनची चर्चा महाराष्ट्रभर होत असते. (Udayan Raje Bhosle taken a New BMW TEX5 car)

उदयनराजे भोसले यांच्याकडे गाड्यांचा भलामोठा ताफा असून त्यांच्या प्रत्येक गाडीचा नंबर “००७” म्हणजेच जेम्स बॉण्ड शी संबंधित आहे. या ताफ्यात आणखी ००७ नंबरची नवी BMW TEX5 सामील झाली असून, पुन्हा एकदा उदयनराजे यांच्या गाड्यांच्या कनेक्शनची चर्चा होताना दिसत आहे. उदयनराजे यांचे गाड्यांवर कमालीचे प्रेम असल्याचे पाहिला मिळते. राजकारणापेक्षा जास्त त्यांना आपला आवडता छंद जोपासण्यात रस असल्याचे दिसून येते. या गाडीची किंमत जवळपास एका कोटी रुपये आहे.( BMW TEX5 car price is 1cr)

आपल्या कॉलेज दिवसांपासूनच उदयनराजे यांना गाड्यांचा खूप नाद होता. तरुण वयात त्यांनी आपली पहिली गाडी जिप्सी खरेदी केली होती. त्याकाळी जिप्सीची खूप मोठी क्रेझ होती. जिप्सी नंतर त्यांनी आपल्या आयुष्यतील दुसरी गाडी ‘महेद्रा’थार विकत घेतली.BMW विकत घेण्याअगोदर त्यांच्याकडे अनेक महागड्या गाड्यांचे कनेक्शन आहे. (Udayan Raje has connections to many expensive cars and now another new cars has been added to it.)

सध्या त्यांच्याकडे टाटा सियार, स्क्रार्पिओ, टाटा इस्टेट, ऑडी, मर्सडिज, पजेरो, सफारी, रेंज रोव्हर अशा अनेक महागड्या त्यांचा ताफ्यात आहेत. या सगळ्या गाड्यांचा शौक त्यांनी पूर्ण केल्यानंतर त्यांना BMW TEX5 या महागड्या गाडीचा मोह आवरला नाही. आणि लगेच त्यांनी BMW TEX5 ही नवी गाडी आपल्या ००७ या ताफ्यात आणत आपला शौक पूर्ण केला आहे.

उदयनराजे हे साधेपणा आणि आपल्या रोखठोक बिंदास बोलल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतात. लोकांनाही त्यांची बोलण्याची स्टाइल साधेपणा, टिपिकल सातरी रांगड्या भाषेमुळे ते आपलेसे वाटतात. उदयनराजेंची तरुणाईमध्ये फार मोठी क्रेझ असल्याचे पाहिला मिळते. त्याच्या कॉलर उडवण्याचा स्टाइलचे तर शरद पवार दिवाणे असल्याचं स्वतः शरद पवारांनी स्वतःकबूल केल्याचे आपण पाहिले असेल. उदयनराजे सद्या भाजपकडून राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेले आहेत.

हेही वाचा:

प्रेम करताय..? सावधान..! ..नाहीतर तुम्हालाही मिळेल सजा         

Uttar Pradesh:पिझ्झा खाण्याची इच्छा पडली महागात;तरुणीचा घेतला बळी,वाचून बसेल धक्का

DasaraMelava:वर्षभरात घडलेल्या सर्व गोष्टींची सव्याज परत फेड करणार:शिवसेना                   

IPL-2021: काय सांगता? चेन्नईला धूळ चारून कोलकत्ता जिंकणार आयपीएलची फायनल       

बापरे! पेट्रोल डिझेलच्या किमतीत (Petrol Diesel price) कमालीची वाढ, या शहरात पेट्रोल 116 रूपये तर डिझेल 103 रुपयावर     

      Amazon Great Indian Festival : Redmi कंपनीचा हा स्मार्टफोन फक्त 7,020 मध्ये उपलब्ध

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.