IPL-2021: काय सांगता? चेन्नईला धूळ चारून कोलकत्ता जिंकणार ‘आयपीएल’ची फायनल

गेल्या अनेक दिवसांपासून आयपीएल सीजन14 चा विजेता कोण असणार? याची प्रतीक्षा क्रिकेट चाहत्यांना लागून राहिली होती. आता ही प्रतीक्षा शुक्रवारी पंधरा तारखेला संपुष्टात येणार असून, चाहत्यांना कोलकत्ता नाइट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग या दोन संघापैकी एक विजेता होताना पाहायला मिळणार आहे.

भारताचा माजी ‘कॅप्टनकूल’ महेंद्रसिंग धोनीच्या लोकप्रियतेमुळे चेन्नई सुपर किंग संघाचे जगभरातून असंख्य चाहते असल्याचे पाहिला मिळते. धोनीमुळे चेन्नई सुपर किंग संघाचा खूप मोठा चाहता वर्ग बनला आहे. ‘चेन्नईचे फॅन्स’ कमालीचे इमोशन्स घेऊन सामना पाहण्यासाठी येत असतात. अनेकवेळा आपण पाहिले असेल, एखादा महत्वाचा सामना चेन्नईने जर गमावला,तर हे फॅन्स अक्षशः रडू लागतात. कोलकाता नाईट रायडर्स संघाचा देखील चाहता वर्ग आहे, मात्र चेन्नईच्या तुलनेत त्यांच्याकडे एवढा मोठा चाहता वर्ग नाही, हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही.

पुढीलवर्षी आयपीएलच्या हंगामात दोन नवीन ‘संघ’ येणार असल्याने,मोठा ऑक्शन होणार आहे. त्याचबरोबर महेंद्रसिंग धोनीचा हा शेवटचा आयपीएल सीझन असू शकतो, असं क्रिकेट वर्तुळात बोलले जात आहे. आणि म्हणून क्रिकेटच्या चाहत्यांना खास करून धोनीच्या फॅन्सना धोनीचा शेवट हा विजयानेच व्हावा. असं मनोमन वाटत असल्याचं दिसून येत आहे. मात्र कोलकत्त्याचं तगडं आव्हान, चेन्नई समोर असल्यामुळे आयपीएल विजेतेपदाला गवसणी घालणं, त्यांना अवघड जाणार असल्याचं स्पष्ट आहे.

‘चेन्नई सुपर किंगने’ दिल्ली कॅपिटल संघाचा पराभव करत तब्बल नवव्यांदा आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे कोलकत्ता नाइट रायडर्सने आयपीएलच्या दुसऱ्या हाफमध्ये जबरदस्त क्रिकेट खेळत दिमाखात फायनलमध्ये प्रवेश केला. भारतात झालेल्या पहिल्या ‘हाफ’मध्ये कोलकत्ता नाइट रायडर्स संघाला सात सामन्यात अवघे दोन विजय मिळवता आले होते. मात्र त्यानंतर सेकंड हाफमध्ये कोलकत्ताने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. सेकंड हाफमध्ये त्यांनी नऊ सामन्यात तब्बल सात विजय मिळवले. यात त्यांनी अनेक बलाढ्य संघांना पराभवाची धूळ चारत फायनलमध्ये धडक मारली. एलिमीनेटर सामन्यात ‘रॉयल चॅलेंजर्स’ला तर क्वालीफायरमध्ये आयपीएलमधील सर्वात बलशाली समजल्या जाणाऱ्या ‘दिल्ली कॅपिटल्स’लाही पराभवाची धूळ चारत फायनलमध्ये प्रवेश केला.

अनेक क्रिकेट चाहत्यांना ‘चेन्नई सुपर किंग’ फायनलमध्ये कोलकत्ता नाईट रायडर्सचा सहज पराभव करत विजेतेपदावर आपले नाव कोरल. असं वाटत असलं तरी, परिस्थिती याच्या उलट आहे. सेकंड हाफमध्ये कोलकत्ता नाईट रायडर्सने चेन्नईपेक्षा अधिक उत्तम क्रिकेट खेळलं असून, त्यांचे सर्वच खेळाडू चांगलेच लईत असल्याचे दिसते आहे. महेंद्रसिंग धोनीच्या रूपात चेन्नईकडे दांडगा अनुभव असला तरी,दुसरीकडे कोलकत्ताकडे देखील वर्ल्डकप विनर कॅप्टन ‘मॉर्गन’ आहे. याकडे देखील दुर्लक्ष करता येणार नाही.

चेन्नईपेक्षा कोलकत्ता सरसच!

दोन्ही संघातल्या खेळाडूंच्या परफॉर्मन्स विषयी चर्चा केली तर, कोलकत्ता नाइट रायडर्सचे खेळाडू चेन्नईच्या खेळाडूंपेक्षा सरस वाटतात. बॉलिंग आणि बॅटिंग अशा दोन्ही डिपार्टमेंटमध्ये चेन्नईच्या खेळाडूंपेक्षा कोलकत्ताच्या खेळाडूंनी सरस कामगिरी केल्याचे जाणवते. खाकरून कोलकत्याच्या स्पिनर्सनी पाठीमागच्या काही सामन्यात अपोजिट संघाला जवळपास नेस्तनाबूत केल्याचे दिसून येते. तसेच त्यांच्या सलामवीरांनी देखील प्रत्येक सामन्यात चांगली सुरुवात दिलेली आहे. दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्स संघाचा विचार केला तर, त्यांच्याकडे धोनी नावाचे एक असे रसायन आहे,जे आपल्या रणनीतिने सामन्याचे पारडे फिरवण्याची क्षमता ठेवते. मात्र प्रत्येक सामन्यात ही जादू चालेलच असं नाही.

‘धोनी’कडे प्रचंड दांडगा अनुभव असला तरी,मिडल ऑर्डर हा त्यांच्या साठी डोकेदुखीचा विषय ठरत आहे. पाठीमागच्या सामन्यात रॉबिन उथप्पाने तीन नंबरला येऊन जबरदस्त फलंदाजी केली आहे.  मात्र तो या मोसमात अधिक सामने खेळला नसून, त्याने खूप कमी फलंदाजी केली आहे. सलामीवीर ‘फाफ डु प्लेसिस’च्या फलंदाजीत देखील सातत्य पाहायला मिळत नाही. त्याचबरोबर चेन्नई सुपर किंगच्या फिरकीपट्टूनीही आपल्या संघाला साजेशी अशी कामगिरी केलेली नाही. हा देखील चेन्नई सुपर किंगसाठी डोकेदुखीचा विषय राहिला आहे. पाठीमागच्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीने आपला जुना जलवा दाखवत संघाला विजय मिळवून दिला असला तरी, तो फलंदाजीसाठी लवकर म्हणजेच वरच्या क्रमांकावर येणार का? याचं देखील उत्तर क्रिकेट चाहत्यांना शोधावं लागणार आहे. उद्या होणारा आयपीएल२०२१चा फायनल रोमांचक होण्याची शक्यता असली तरी, या सामन्यात ‘कोलकत्ता नाइट रायडर्स’ चेन्नई सुपर किंग संघापेक्षा काही प्रमाणात उजवा वाटत आहे. हे नाकारता येणार नाही. मात्र क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असल्यामुळे कधी कोण बाजी मारेल! हे निश्चित सांगता येणं शक्य नाही.

हेही वाचा:

प्रेम करताय..? सावधान..! ..नाहीतर तुम्हालाही मिळेल सजा 

Uttar Pradesh:पिझ्झा खाण्याची इच्छा पडली महागात;तरुणीचा घेतला बळी,वाचून बसेल धक्का

Dasara Melava:वर्षभरात घडलेल्या सर्व गोष्टींची सव्याज परत फेड करणार:शिवसेना 

IPL-2021: काय सांगता? चेन्नईला धूळ चारून कोलकत्ता जिंकणार आयपीएलची फायनल

बापरे! पेट्रोल डिझेलच्या किमतीत (Petrol Diesel price) कमालीची वाढ, या शहरात पेट्रोल 116 रुपये तर डिझेल 103 रुपयावर

Amazon Great Indian Festival : Redmi कंपनीचा हा स्मार्टफोन फक्त 7,020 मध्ये उपलब्ध

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.