प्रेम करताय..? सावधान..! ..नाहीतर तुम्हालाही मिळेल’ही’सजा

पुणे| प्रेम म्हणजे प्रेम असतं,तुमचं आमचं सेम असतं,हे वाक्य आपण अनेकदा ऐकलं असेल, वाचलं असेल. प्रेमासाठी वाट्टेल ते करणाऱ्यांची संख्या समाजात काही कमी नाही. काही महिन्यांपूर्वी उस्मानाबादचा एक तरुण, आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी थेट पाकिस्तानला निघाला होता. पाकिस्तानच्या सिमेवर बीएसएफच्या जवानांनी त्याला पकडल्याचे वृत्त आपण वाचलेच असेल. मात्र यांच्यापेक्षाही आश्चर्यकारक घटना आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

प्रेमासाठी वाट्टेल ते करणारी मंडळी खूप धोकादायक असतात,हे वेगळे सांगायला नको. मात्र याच्यापेक्षाही जास्त धोकादायक प्रेमभंग झालेली ‘कार्टी’ बनतात हे कोणीही नाकारू शकणार नाही. याची अनेक उदाहरणे देखील आपल्याला माहिती असतील. आज आम्ही तुम्हाला पुण्यातल्या सिंहगड रोड परिसरातली अशीच एक धक्कादायक घटना सांगणार आहोत.

प्रेमात प्रेमभंग झालेल्या तरुणाचं नाव प्रशांत हगवणे असून त्याची ओळख एका एकवीस वर्षीय तरुणीशी फेसबुकच्या माध्यमातून झाली. फेसबुकवर बोलत बोलत कधी एकमेकांच सुत जुळलं हे दोघानाही कळाले नाही. गेली चार वर्ष हे एकमेकांच्या प्रेमात पुरते बुडाले होते. आता दोघांनीही आपल्या जन्माची रेशीमगाठ एकाच धाग्याने बांधायचा निर्णय घेतला. मात्र दोघांचीही जात वेगवेगळी असल्याने या लग्नाला घरच्यांनी विरोध केला.

अनेक वर्ष ते एकमेकांच्या प्रेमात बुडाल्यामुळे त्यांना आता अधिक ‘विरह’ सहन होत नव्हता. मात्र घरच्यांच्या पुढं या दोघांचंही काही चालेना. हे दोघेही वेगळं होणार नाहीत हे लक्षात घेऊन मग प्रशांत हगवणे,याच्या घरच्यांनी काही महिन्यांपूर्वी त्याच लग्न लाऊन दिलं. “जर याच लग्न लाऊन दिलं,तर हा आपल्या संसारात गुंफून जाईल आणि त्याच्या प्रियशीला विसरून जाईल” असा घरच्यांचा समज होता. मात्र झालं उलटचं. आपल्या प्रियशीला विसरून जाण्याऐवजी या तरुणाने कळसच गाठला.

लग्न झाल्यानंतर देखील हा प्रेमवीर आपल्या २१ वर्षीय ‘प्रियसी’शी बोलतच राहिला. प्रशांतचं लग्न होऊन देखील तो आपल्या मुलीला त्रास देत आहे, हे लक्षात घेऊन, मुलीच्या घरघ्यांनी तिचं लग्न जमवलं. आता तरी प्रशांत आपल्या मुलीचा पिछा सोडेल,असं त्यांना वाटत होतं. मात्र असं काहीही घडलं नाही. या बहाद्दरानं थेट आपल्या ‘प्रियसी’च्या होणाऱ्या नवऱ्यालाच गाठलं. आणि गेल्या अनेक वर्षांपासून आमचे ‘प्रेमसंबंध’ असल्याचं सांगत हे लग्न मोडून टाकले.

प्रशांतने केलेला कारनामा जेव्हा सगळ्यांना समजला तेव्हा मात्र तळपायाची आग मस्तकात गेली, आणि मग मुलीच्या घरघ्यांनी लगेच हवेली पोलिस स्टेशनला धाव घेतली. मुलीच्या आणि घरच्यांच्या सांगण्यावरून हवेली पोलिस ठाण्यात पोलीसांनी आरोपी ‘प्रशांत आगवणे’विरोधात रितसर लेखी तक्रार दाखल करुण घेतली. या घटनेचा पुढील तपास संबंधित पोलिस अधिकारी, करीत असल्याची माहिती आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.