IPL2021:क्वालीफायर आणि एलिमिनेटर हा काय प्रकार आहे?तो कधीपासून अस्तित्वात आला जाणून घ्या एका क्लिकवर

दुबईमध्ये सुरू असलेली आयपीएल सीजन14 ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यावर येऊन ठेपली असून,या स्पर्धेतील अवघे दोनच सामने शिल्लक राहिले आहेत. पहिल्या कॉलिफायरमध्ये चेन्नई सुपर किंगने दिल्लीला पराभूत करत तब्बल नवव्यांदा फायनलमध्ये धडक मारली आहे.

‘आयपीएल’२०२१ चा विजेता कोण असणार?याची दिर्घकाळ लागून राहिलेली प्रतिक्षा आता दोनच दिवसात ‘संपुष्टात’ येणार आहे. (Delhi capital V’s kolkata knight riders qualifier 2)

चेन्नई सुपर किंग,दिल्ली कॅपिटल्स,रॉयल चॅलेंजर बेंगलोर आणि कोलकत्ता नाइट रायडर्स हे चार संघ ‘प्लेअॉफ’मध्ये पोहचले होते. चेन्नईने दिल्लीला पराभूत करत फायनलचे तिकीट मिळवले. तर दुसरीकडे कोलकत्ताने बॅगलोंरचा पराभव करत कॉलिफायर२ मध्ये धडक मारली. आता कोलकत्ताला फायनलमध्ये पोहचण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स संघाशी दोन हात करावे लागणार आहेत.

 

‘चेन्नई सुपर किंग’ विरुद्ध पहिल्या कॉलिफायर सामन्यात दिल्लीचा पराभव होऊनही फायनलमध्ये पोहचण्यासाठी त्यांना आणखी एक संधी मिळाली आहे. तर दुसरीकडे कोलकत्ताने बॅगलोंरचा पराभव केल्यामुळे बॅगलोंरने या स्पर्धेतून आपला गाशा गुंडाळला आहे. बॅगलोंर विरूद्धच्या सामन्यात कोलकाता ‘विजयी’ होऊनही अद्याप फायनलमध्ये पोहचली नाही. फायनलमध्ये पोहचण्यासाठी आज त्यांना दिल्लीला पराभूत करावं लागणार आहे. याचा अर्थ तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल,दिल्लीचा पराभव होऊन देखील फायनलमध्ये पोहचण्याची आणखी एक संधी त्यांना मिळाली आहे. तर कोलकत्ताने बॅगलोंरचा पराभव करून देखील ते अद्याप अंतिम फेरीत पोहचले नाहीत. त्यासाठी त्यांना दिल्लीचा आज पराभव करावा लागणार आहे. याचा अर्थ बॅगलोंर आणि कोलकत्ता यांना दिल्लीप्रमाणे,एक एक्स्ट्रा संधी मिळाली नाही. हे तुमच्या लक्षात आले असेल. मात्र असा नियम का केला गेला आहे? याचे कारण तुम्हाला माहिती आहे का?

...तर चला मग या नियमाविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया.

‘२००८’साली सुरू झालेली ही स्पर्धा क्रिकेट चाहत्यांच्या कमालीची पसंतीस उतरली. या स्पर्धेने आता जगातील सर्वोत्कृष्ट स्पर्धा म्हणून नावलौकिक मिळवला आहे. हे आपणा सर्वांना माहीतच आहे. ठराविक काळानंतर ‘आयपीएल’च्या अधिकाऱ्यांनी या स्पर्धेतील काही नियमांमध्ये बदल केले. भारतीय क्रिकेट बोर्डाचा ‘डीआरएस’ या प्रणालीला नेहमी विरोध राहिला आहे. मात्र आता आयपीएलमध्ये देखील ही प्रणाली अवलंबली जाऊ लागली आहे. बीसीसीआयने केलेला हा एक नवीन बदल म्हणता येईल.

डीआरएस बरोबरच ‘आयपीएल’मध्ये सर्वात मोठा बदल करण्यात आला,ज्यामुळे अनेकांनी या बदलाचे स्वागत करत कौतुक देखील केल्याचं पाहायला मिळालं. तो नियम म्हणजे ‘एलिमिनेटर’ आणि कॉलिफायर.

2010 पर्यंत आयपीएल स्पर्धेतील गुणतालिकेत अव्वल असणाऱ्या सुरुवातीच्या चार संघांमध्ये ‘सेमीफायनल’ खेळवली जायची. आणि ‘सेमी फायनल’मध्ये जिंकणाऱ्या संघांना आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश मिळायचा. ‘सेमीफायनल’मध्ये जिंकणाऱ्या दोन संघांमध्ये आयपीएलची फायनल खेळवली जायची. मात्र हा नियम सुरुवातीच्या एक आणि दोन क्रमांकावर असणार्‍या संघांवर थोड्याफार प्रमाणात अन्यायकारक ठरत असल्याचे म्हटले गेले. आणि या नियमात 2011 पासून बदल करण्यात आले.

प्रत्येक संघाला साखळीत 14 सामने खेळायचे असतात, हे आपल्याला माहीत आहे. साखळीतले 50% म्हणजेच ७ सामने जिंकून देखील तुम्ही काहीवेळा ‘सेमीफायनल’मध्ये प्रवेश करू शकता,हे अनेकांच्या लक्षात आलं. तर दुसरीकडे एक संघ तब्बल 10 सामने जिंकून सेमीफायनलमध्ये प्रवेश करतानाही दिसून आला. या दोन संघांमधील ही फार मोठी तफावत अनेकांच्या लक्षात आल्यानंतर या नियमात बदल व्हायला पाहिजे,असे अनेकांनी म्हटलं.

साखळी सामन्यात सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या आणि क्रमांक एक आणि दोनवर ‘फिनीश’ करणाऱ्या संघांना फायनलमध्ये प्रवेश करण्याची आणखी एक संधी मिळायला हवी,असं अनेक क्रिकेट दिग्गजांनी म्हटलं. सर्व स्तरांतून या नियमावर टीका झाल्यानंतर २०११ला बीसीसीआयने या नियमात बदल केला. आणि तेव्हापासून म्हणजेच 2011 नंतर ‘कॉलिफायर’ आणि ‘एलिमिनेटर’ या दोन नियमाचा वापर केला जाऊ लागला. आणि साखळी सामन्यानंतर नंबर एक आणि दोन क्रमांकावर असणाऱ्या संघांना फायनलमध्ये पोहचण्याची उर्वरित दोन संघाच्या तुलनेत आणखी एक संधी दिली गेली.

आता आपण ‘कॉलिफायर’ आणि एलिमिनेटर हा काय प्रकार आहे? हे पाहू.

साखळीत 14 सामने खेळल्यानंतर जे दोन संघ 1 आणि 2 या क्रमांकावर राहतील, त्या दोन संघांना उर्वरित दोन संघाच्या तुलनेत फायनलमध्ये पोहचण्याची आणखी एक एक्स्ट्रा संधी दिली जाते. एक आणि दोन या क्रमांकावर असणाऱ्या संघांमध्ये क्वालिफायर चा सामना खेळवण्यात येतो. म्हणजेच या दोन संघामध्ये जो जिंकतो तो थेट फायनलमध्ये प्रवेश करतो. आणि पराभूत संघ स्पर्धेबाहेर ‘न’ जाता त्याला आणखी एक संधी दिली जाते.

एक आणि दोन क्रमांकावर असणाऱ्या संघांमध्ये क्वालिफायरचा सामना खेळवल्यानंतर नंबर3 आणि 4 या क्रमांकावर असणाऱ्या संघांमध्ये ‘एलिमिनेटर’ म्हणून सामना खेळवला जातो. आणि या सामन्यात जो संघ पराभूत होईल तो या स्पर्धेतून बाहेर फेकला जातो. तर विजयी संघाला फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी ‘क्वालिफायर’मध्ये पराभूत झालेल्या संघासोबत जिंकावं लागतं. जो संघ या सामन्यात जिंकेल म्हणजेच ‘क्वालिफायर२’ मध्ये जिंकेल तो फायनलमध्ये प्रवेश करतो. आणि पराभूत संघाला या स्पर्धेतून आपला गाशा गुंडाळला लागतो.

प्रेम करताय..? सावधान..! ..नाहीतर तुम्हालाही मिळेल सजा 

Uttar Pradesh:पिझ्झा खाण्याची इच्छा पडली महागात;तरुणीचा घेतला बळी,वाचून बसेल धक्का

Dasara Melava:वर्षभरात घडलेल्या सर्व गोष्टींची सव्याज परत फेड करणार:शिवसेना 

IPL-2021: काय सांगता? चेन्नईला धूळ चारून कोलकत्ता जिंकणार आयपीएलची फायनल

बापरे! पेट्रोल डिझेलच्या किमतीत (Petrol Diesel price) कमालीची वाढ, या शहरात पेट्रोल 116 रुपये तर डिझेल 103 रुपयावर

Amazon Great Indian Festival : Redmi कंपनीचा हा स्मार्टफोन फक्त 7,020 मध्ये उपलब्ध

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.