IPL2021:’देवदत्त पड्डिकल’ची विकेट ‘न’ दिल्याने चाहते भडकले; म्हणाले.. रात्रीची अजूनही उतरली नाही काय

आयपीएल सीजन१४ ही स्पर्धा ताता अंतिम टप्प्यात येऊन ठेपली असून प्रत्येक सामन्यानंतर ‘प्ले ऑफ’च समीकरण बदलताना दिसून येत आहे.(IPL2021)

पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर बेंगलोर यांच्यामध्ये खेळल्या गेलेल्या आजच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर बंगलोरने पंजाब किंग संघाचा पराभव करत ‘प्ले ऑफ’मध्ये धडक मारली आहे. (Royal challengers Bangalore going on play of)

 

‘विराट कोहली’ने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करत किंग्स पंजाब सांघासमोर 165 धावांचे आव्हान ठेवले.

165 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरणार्‍या ‘किंग पंजाब’ संघाने जबरदस्त सुरुवात केली. सुरुवातीच्या दहा षटकात पंजाब किंग्ज संघाने एकही विकेट न गमवता 80 धावा केल्या.

राहुल आणि मयांक खेळत असताना पंजाब संघ सहज जिंकेल असे वाटत होत. मात्र फिरकीपटू युझवेंद्र चहल गोलंदाजीसाठी आला,आणि पंजाब संघाच्या फलंदाजीचं कंबरडंच मोडून काढलं. (Yuzvendra chahal on fire)

युझवेंद्र चहलने टाकलेल्या स्पेलने सामन्याला कलाटणी मिळाली. आणि सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाच्या बाजूने झुकला. पंजाबचे फलंदाज बाद होत गेल्याने,पंजाबला या सामन्यात पराभव पत्करावा लागला.

या सामन्यात पंजाबच्या पराभवापेक्षा क्रिकेट चाहत्यांमध्ये एका वेगळ्याच गोष्टीची चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले.

क्रिकेट खेळताना अंपायर कडून अनेक चुकीचे निर्णय होताना आपण अनेक वेळा पाहिलं असेल. यात विशेष असं काही नाही. अंपायरच्या चुकीच्या निर्णयाला आता खेळाडू चॅलेजही करू शकतात. खेळाडूंनी अंपायरच्या निर्णयावर चॅलेंज केल्यानंतर हा निर्णय तिसरा अंपायर देतो.

तिसरा अंपायर त्याच्या जवळ असणारी tecnology वापरून योग्य तो निर्णय तो देत असतो. हे आपल्याला देखील माहित आहे. मात्र त्यानेच तुकीचा निर्णय दिला तर काय करायचं?

आज खेळलेल्या पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यामधील सामन्यात असंच घडलंय. चक्क तिसऱ्या अंपयारनेच चुकीचा निर्णय दिल्याने क्रिकेट चाहते चांगेच भडकल्याचे पाहिला मिळाले.

त्याच झालं असं,रवी बिस्नोई गोलंदाजीसाठी आला. स्ट्राईकवर असणाऱ्या देवदत्त पडीकलने रवी बिस्नोई चा चेंडू रिव्हर स्वीप मारण्याचा प्रयत्न केला,मात्र चेंडू त्याच्या ग्लोजला लागून विकेट किपर राहुलच्या हातात गेला.

राहूनने बाद असल्याचे अपील केले,मात्र अंपायरने ‘नॉट आऊट’ दिलं. अंपायरने नॉट आऊट दिल्यानंतर राहुलने लगेच DRS घेतला. अल्ट्राएज मध्ये चेंडू देवदत्तच्या ग्लोजला लागला असल्याचे स्पष्ट झाले. तरीदेखील तिसऱ्या अंपायरने ‘नॉट आऊट’च दिल्याने ऑनफिल्ड अंपायर देखील आश्र्चर्यचकित झाला.

 

तिसऱ्या अंपायरने दिलेल्या या चुकीच्या निर्णयामुळे पंजाबचा कॅप्टन राहुल देखील नाराज दिसला. अनेक क्रिकेट चाहते या अंपायरला सोशल मीडियावर शिव्याही घालू लागले.

चेंडू ग्लोजला लागल्याचे स्पष्ट दिसत असूनही तिसरा अंपायर खेळाडूला नॉट आऊट कसं काय देऊ शकतो? असा संतप्त सवाल क्रिकेट चाहत्यांकडून उपस्थित केला गेला.

काही क्रिकेट चाहते तर, या अंपायरची रात्रीची अजूनही उतरली नाही काय? असाही घणाघात या अंपायरवर करताना पाहायला मिळाले.

 

क्रिकेट चाहत्यांबरोबरच अनेक क्रिकेट दिग्गजांनी देखील देवदत्त पड्डीकलला नॉट आऊट दिल्याने आश्चर्य व्यक्त केल्याचे दिसून आले आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.