Mahatma Gandhi:’नथुराम गोडसे जिंदाबाद’म्हणणाऱ्यांचे प्रमुखही सर्वप्रथम गांधीजींना श्रद्धांजली वाहतात:शिवसेनेचा ‘मोदीं’वर हल्लाबोल?

काल राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 152 वी जयंती होती. विविध माध्यमातून काल भारतवासीयांनी गांधी जयंती निमित्त महात्मा गांधी यांना अभिवादन केलं.

मात्र कालच्या दिवशी सगळ्यात दुर्दैवी आणि धक्कादायक घटना देखील घडली. गांधीजींची हत्या करणारा नथुराम गोडसे काल ट्विटरवर ट्रेंड झाल्याने सगळ्यांनी आश्चर्य व्यक्त केले. काल ट्विटरवर ‘नथुराम गोडसे जिंदाबाद’असा हॅशटॅग ट्रेंड झाला याला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. तसेच गोडसेच्या विचारधारेचा पक्ष सत्तेत असल्यामुळेच अशा घटना घडत असल्याचं मत,अनेकांनी व्यक्त केलं.

बॉलीवूडची रंगीला गर्ल आणि सध्या शिवसेनेत असणारी उर्मिला मातोंडकर यांनीदेखील या घटनेचा निषेध नोंदवत अप्रत्यक्षपणे मोदींवर हल्लाबोल चढविला आहे.

शिवसेनेच्या नेत्या ऊर्मिला मातोंडकर म्हणाल्या,कमाल आहे. ट्विटरवर ‘नथुराम गोडसे जिंदाबाद’ असा ट्रेंड चालवणाऱ्यांचे प्रमुख देखील जगाला दाखवायला का होईना, पण सर्वप्रथम गांधीजींना अभिवादन करायला पोहोचतात.

 

काल गांधी जयंती निमित्त अनेक बड्या नेत्यांनी गांधीजींना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या राजघाट येथील समाधीस्थळी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हजेरी लावली होती.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील महात्मा गांधींच्या समाधीस्थळाचे दर्शन घेत गांधीजींना श्रद्धांजली वाहिली होती. आणि याचाच संदर्भ घेत शिवसेना नेत्या ऊर्मिला मातोंडकर यांनी अप्रत्यक्षपणे नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.

‘नथुराम गोडसे जिंदाबाद’ असा ट्रेंड चालवणाऱ्यांचे प्रमुख देखील सर्व प्रथम गांधीजींना श्रद्धांजली वाहण्यासाठी पोहोचतात. असं वक्तव्य उर्मिला मार्तोंडकर यांनी केल्यामुळे आता नवा वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत उर्मिला मातोंडकरने काँग्रेस कडून उत्तर मुंबई मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली. मात्र या निवडणुकीत उर्मिला मातोंडकर यांचा पराभव झाला.

पराभूत झाल्यानंतर ऊर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर यांना विधानपरिषद मिळणार असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून होत आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.