आपण सारे प्रतिष्ठान आयोजित ‘तिची गरुड झेप’ कार्यक्रमात सात्विक मिल्क अॅड मिल्क प्रोडक्ट उतरतंय ग्राहकांच्या पसंतीस

पुणे प्रतिनिधी: उच्च शिक्षण घेऊन कुठेतरी चांगल्या पगाराची नोकरी करायची,अशी जवळपास प्रत्येकाचीच इच्छा असते. मात्र प्रत्येकाला चांगल्या पगाराची नोकरी मिळतेच असं नाही.

आपण पाहतोय भारतात, ‘बेरोजगारी’च्या दराची काय अवस्था आहे. ‘बेरोजगारी’च्या या युगात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणं ही खूप मोठी तारेवरची कसरत आहे.

आपण अनेकदा पाहतो,बरीचशी मुलं उच्च शिक्षण घेऊन चार पैशाच्या नोकरीसाठी शहराकडे धाव घेतात. विशेष म्हणजे गावाकडे मोठ्या प्रमाणात ‘शेती’ असूनही काही मुलं नोकरीला बळी पडतात. यात सगळा त्यांचाही दोष नाहीच म्हणा.

‘शेती’ करायची म्हटल्यावर, शेतकऱ्यांना अनेक संकटाना सामोरं जावं लागतं. त्याच्या कोणत्याही पिकाला हमीभाव नाही. कधी कोणतं पीक कवडीमोल भावाने विकल जाईल हे त्यालाही माहिती नसतं. वरून मेघराजा कोपला की सगळं होत्याचं नव्हतं होवून बसत. आणि म्हणूनच कदाचित तरुण शेतीकडे पाठ फिरवत शहराकडे धाव घेत असावा. मात्र काही तरुण याला अपवाद देखील आहेत.

‘जुन्नर’तालुक्यातील ‘ओतूर’ या गावातील ‘रोहित डुंबरे’ हा तरुण याला अपवाद आहे. ‘MBA’ चं शिक्षण घेऊन नोकरी ‘न’ करता गावातच आपला काहीतरी ‘उद्योग’ असावा म्हणून या तरुणाने “सात्विक मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट” हा व्यवसाय सुरु केला.

‘रोहित डुंबरे’ यांचा मुळ व्यवसाय ‘शेती’ आहे. मात्र शेतीत काही राम नाही,हे त्याच्या लक्षात आलं. ‘शेती’ला जोड धंदा म्हणून त्यांचा दुधाचा व्यवसाय देखील आहे. मात्र दुधाच्या दराचा विचार केला तर तिथे देखील शेतकऱ्यांची पिळवणूक होताना दिसते. आणि म्हणून शेवटी वैतागून ‘रोहित डुंबरे’ या तरुणाने ‘दूध’ न विकता या दुधापासून आपण स्वतः दुधाचे पदार्थ बनवायचे आणि ते स्वतः विकायचे ठरवले.

प्रबळ ‘इच्छाशक्ती’ असेल तरी कोणतीही गोष्ट अशक्य नसते. हे वाक्य या तरुणांना तंतोतंत लागू होत.

‘रोहित डुंबरे’ या तरुणाने दुधापासून बनणारे पदार्थ बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. आणि या व्यवसायाला सात्विक मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट असं नाव दिलं.

कोणताही व्यवसाय सुरु करताना त्याची ‘विश्वासार्हता’ खूप महत्त्वाची असते. ‘सात्विक’ या नावाप्रमाणेच या तरुणाने ‘सात्विक’ पदार्थ बनवण्यावर जोर दिला. आणि अल्पावधीतच “सात्विक मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट” ग्राहकांच्या पसतीला उतरलं.

‘जुन्नर’ तालुक्यात ‘ओतूर’मध्ये सुरु केलेल्या ‘सात्विक मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट’चे दिवाणे आता संपूर्ण ‘महाराष्ट्र’भर असल्याचे दिसून येते. ग्राहकांना महाराष्ट्रात कुठेही अगदी मुफ्त होम डिलिव्हरी मिळत असल्याने ग्राहकांसाठी ही मोठी पर्वणीच ठरत आहे.

“सात्विक मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट” दिवाळीनिमित्त ग्राहकांसाठी आता एक स्पेशल ऑफर घेऊन आलंय.

‘५९९’ रुपयाचं गावरान गायीचं तूप आता ग्राहकांना ‘४९९’ रुपयांत मिळणार आहे. त्याचबरोबर ‘म्हशी’च ६९९ रुपयाचं ‘तूप’ आता ५९९ रुपयात मिळणार आहे. अशा बऱ्याच पदार्थांवर ‘सात्विक मिल्क’ भन्नाट ऑफर्स घेऊन आलं आहे.

जर तुम्हाला या ऑफर्सचा लाभ घ्यायचा असेल तर,’आपण सारे प्रतिष्ठान’ आयोजित तिची ‘गरुड झेप’ भव्य प्रदर्शन व विक्री या कार्यक्रमाला भेट द्यावी लागेल.

‘सात्विक मिल्क अॅड मिल्क प्रोडक्ट’ यांनी देखील ग्राहकांच्या सेवेसाठी आपण सारे प्रतिष्ठान, आयोजित “तिची गरुड झेप” या कार्यक्रमात स्टॉल लावला आहे. हा ‘स्टॉल’ १ ते ३ अॉक्टोंबरला ‘अजिंक्य मंगल कार्यालयात’ असून या ‘स्टॉल’ला भेट देण्यातची वेळ सकाळी ११ ते रात्री ९ पर्यंत ठेवण्यात आली आहे.

आमच्या ‘स्टॉल’ला ग्राहक मोठ्या प्रमाणात भेट देत असून,आमचा ‘सात्विक’ पदार्थ ग्राहकांच्या पसतीला देखील उतरत असल्याने आम्हाला खूप मोठं समाधान वाटतंय.

ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने, आम्ही घेतलेल्या मेहनतीला यश आलं असल्याचं ‘सात्विक मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट’चे सर्वेसर्वा रोहित डुंबरे यांनी ‘महाराष्ट्र लोकशाही’शी बोलताना सांगितले.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.