INDWvsAUSW;’सांगली’च्या वाघीणीने झळकावले ऑस्ट्रेलियात शतक;होत आहे सर्व स्तरातून कौतुक

भारतीय महिला संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. तीन वन-डे मालिकेत सुरुवातीच्या दोन सामन्यात भारताचा पराभव झाला. मात्र त्यानंतर भारतीय महिला संघाने लय पकडली. आणि शेवटचा एकदिवसीय सामना जिंकत आपण देखील खेळण्यासाठीच आलो आहोत,ते दाखवून दिले.

भारतीय महिला संघाने तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 2-1 अशी गमवल्यानंतर सगळ्यांना उत्सुकता होती ती कसोटी सामन्याची.

३० सप्टेंबर पासून ओवल मैदानावर सुरू झालेला एकमेव कसोटी सामन्यात भारताच्या सलामवीरांनी जबरदस्त कामगिरी करत चाहत्यांना आनंद साजरा करण्याची संधी दिली.

सांगलीच्या ‘स्मृती मंधना’ने जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करत आपल्या कारकिर्दीतले पहिले शतक झळकावत ऐतिहासिक कामगिरी केली आणि ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना बॅकफूटवर नेऊन ठेवले.

 

‘स्मृति मंधाना’ने ठोकलेल्या शतकाच्या जोरावर भारताने आतापर्यंत दोन विकेटच्या मोबदल्यात ७४ ओव्हरमध्ये २०० धावा केल्या आहेत. स्मृती मंधनाला शेफालीने चांगली साथ दिली. शेफाली ६४ चेंडूत ३१ धावांची खेळी करून तंबूत परतली.

भारताची सलामवीर स्मृती मंधनाने केलेल्या या ऐतिहासिक कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होताना पाहायला मिळत असून, अनेकांनी तिला शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

 

‘स्मृति’ पहिल्या दिवशी नाबाद 80 धावांची खेळी केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना म्हणाली होती,गेल्या तीन महिन्यांपासून ‘मी’ गुलाबी चेंडू माझ्या ‘बॅग’मध्ये ठेवला होता. या चेंडूवर आम्हाला फारशी प्रॅक्टिस करायला मिळाली नाही. मात्र मी या चेंडूला गेल्या तीन महिन्यापासून माझ्या बॅगमध्ये ठेवला असल्याने,याच्याशी माझी चांगली ओळख झाली आहे.

पुढे ‘स्मृती मंधना’ म्हणाली होती,जरी मी ८० धावांवर नाबाद असले तरी,शतकाचा अजिबात विचार करत नाही. मी फक्त ‘मेरीट’वर खेळण्याचा प्रयत्न करते.

काल “स्मृती मंधना” बोलताना म्हणाली होती,मी शतकाचा अजिबात विचार करत नाही, आणि अशातच तिने आज आपल्या कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले असल्याने तिच्यासाठी हा खूप मोठा आनंदाचा क्षण आहे.

स्मृती मंधनाने 216 चेंडूत 127 धावांची खेळी केली. या खेळीत तिने एक षटकार तर तब्बल बावीस चौकारांची आतषबाजी केली. भारतीय संघाची धावसंख्या १९५ असताना स्मृती मंधना बाद झाली.

शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा, पुनम राऊत 133 चेंडूत 31 तर कॅप्टन मिताली राज एका धावेवर खेळत होत्या.

धावसंख्या:

भारत;पहिला डाव: २ बाद २०० धावा. 

पूनम राऊत खेळत आहे, ३१

मिताली राज खेळत आहे,०१

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.