flipkart Sale: Realme नाचों रे नाचों…’फ्लिपकार्ट’वर मिळणार तब्बल दहा हजारांनी स्वस्त फोन

Flipkart Sale Realme:  शॉपिंग’ हा अनेकांच्या अगदी जवळचा आणि आवडीचा विषय आहे. कुठे काय नवीन मिळतंय?हे माहीत पडताच तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे आपण अनेक वेळा पाहिलं असेलच. (Flipkart  sale : Huge Discount Realme Smartphones including Realme 8i, Realme 8 5G)

भारतीयांच्या बाबतीत बोलायचं झालं तर, या मंडळींना सेल,ऑफरचा लाभ घ्या,असं सांगावंच लागतं नाही. कुठे मोठा सेल,ऑफर लागली असेल तर,ही लोकं त्याठिकाणी ‘टपकलीच’ म्हणून समजा.

‘शॉपिंग’ हा प्रतेकाच्या आवडीचा विषय असला तरी,धावपळीच्या जीवनात आपल्याला मनसोक्त ‘शॉपिंग’ करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतोच असं अजिबात नाही. आणि म्हणून प्रबळ इच्छा असूनही आपल्याला ‘शॉपिंग’ करता येत नाही. ही खंत नेहमी राहते.

प्रत्येकाचं आयुष्य खूपच बिझी असल्याने अमेझॉन,फ्लिपकार्ट सारख्या ‘ऑनलाइन’ शॉपिंग’च्या विविध ‘ॲप्स’ बाजारात आल्या.
या ‘ॲप’ च्या माध्यमातून प्रत्येकाला भरबसल्या शॉपिंग करणं सहज शक्य झालं. तेही प्रत्येकाला हवी असलेली वस्तू अगदी कमी किंमतीत.

‘Flipkart’ आपल्या ग्राहकांसाठी दरवर्षी वेगवेगळ्या ऑफर्स,सेल घेऊन येत असत. आता देखील ‘Flipkart’ ने ‘बिग बिलियन सेल डेज’ आपल्या ग्राहकांच्या भेटीला आणला असून,याला कमालीचा प्रतिसाद देखील मिळतोय.

‘बिग बिलियन डेज सेल’ ३ऑक्टोंबर पासून १० ऑक्टोंबरपर्यंत लाईव्ह सुरु राहणार असल्याने,ग्राहकांना याचा खूप मोठा फायदा होणार असल्याचं दिसतंय.

 

Flipkart च्या या ‘बिग बिलियन डेज सेल’मध्ये खासकरून मोबाइल फोनवर कमालीची सूट देण्यात आली आहे. या ‘सेल’मधून मोबाईल फोन खरेदी करणारांना आता कमालीचा फायदा होणार आहे. जवळपास सर्वच मोबाईल फोनवर ग्राहकांना आता कमालीच्या ऑफर्स मिळणार आहेत.

कोणकोणते मोबाईल फोन ग्राहकांना कमी किंमतीत मिळणार यावर आपण एक नजर टाकुया.

१) ३९,९०० रुपयांचा ६४ जिबी ‘i phone’ SE आता ग्राहकांना अवघ्या २४,४९९ रुपयांमध्ये मिळणार आहे.

२) ४/६४ जीबी वाला 16,000 रुपयांचा ‘realme’ 8i मोबाईल phone आता तुम्हाला या सेलमध्ये केवळ 11,900 रुपयांना मिळणार आहे.

3) एकवीस हजाराचा ‘realme’ चा 8s,५g मोबाईल phone तुम्हाला केवळ आणि केवळ 16,999 रुपयात मिळणार आहे.

4) २७ हजाराचा ६/१२८ जिबी ‘realme GT master Edition’ ५g मोबाईल phone आता तुम्हाला फक्त वीस हजार ९९९ रुपयात मिळणार आहे. म्हणजेच ह्या फोन खरेदीवर तुम्हाला तब्बल सहा हजारांची सूट मिळणार आहे.

५) ४१ हजारचा ‘realme GT’ ५g, ८/१२८ जीबी मोबाईल phone ग्राहकांना आता या सेलमध्ये ३५,९९९ रुपयांत मिळणार आहे.

३ऑक्टोंबर ते १०ऑक्टोंबर या काळात ‘Flipkart’ ने जो ‘बिग बिलियन डेज सेल’ ग्राहकांच्या भेटीला आणलाय,यामध्ये जवळपास सर्वच फोन खरेदीवर कमालीचा डिस्काउंट मिळणार असल्याचं दिसतय. हा सेल नवीन फोन खरेदी करणाऱ्यांसाठी एक मोठी पर्वणीच ठरणार असल्याचं बोललं जातंय.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.