Photo| कुत्रा पाळल्याने ह्रदयविकाराचा घटका येत नाही;स्विडनच्या सर्वेक्षणातून आले समोर

Photo
Photo

हल्ली शहरात आणि खेड्यात दोन्हीकडे कुत्रा पाळणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात पाहिला मिळते. पूर्वी खेड्याकडे हे प्रमाण जास्त होतं. मात्र अलीकडे शहरात देखील ‘कुत्रा’ पाळणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून येते.

प्रत्येकाचा कुत्रा पाळण्याचा हेतू वेगवेगळा असतो. काहीजण चोरांपासून आपल्या घराच संरक्षण व्हावं,यासाठी कुत्रा पाळतात. खेडे-गावात आपल्या शेळ्या,मेंढ्यांचे लांडग्यांपासून संरक्षण व्हावं,यासाठी कुत्रा प्रामुख्याने पाळला जातो. तर काही जण प्राण्यांविषयी प्रचंड प्रेम असल्याकारणाने कुत्र्याचं संगोपन करताना दिसून येतात. अलीकडे हे प्रमाण अधिक असल्याचेही एका सर्वे्षणातून स्पष्ट झाले आहे.

‘कुत्रा’पाळण्याचे अनेक फायदे आपल्याला सहज सांगता येतील. मात्र आज आम्ही तुम्हाला कुत्रा पाळण्याचा असा एक फायदा सांगणार आहोत जो तुम्ही ऐकून आश्चर्य चकित व्हाल.

कुत्रा पाळण्याऱ्यांना मृत्यूचा आणि हृदयरोगाचा धोका इतरांच्या तुलनेत कमी असतो. अशी माहिती स्विडनमध्ये एका निरीक्षणातून समोर आली आहे. बसला ना आश्चर्याचा धक्का?

स्विडनच्या 34 लाख लोकांच्या निरीक्षणातून ही बाब पुढे आली आहे. ४०ते ८० वयोगट दरम्यानच्या लोकांची आकडेवारी शास्त्रज्ञांनी सरकारी कार्यालयातून मिळवून त्यावर अभ्यास केला. आणि त्यातून हा निष्कर्ष समोर आला.

‘कुत्रा’ पाळणारी लोकं कुत्रा ‘न’ पाळणाऱ्यांच्या तुलनेत अधिक आनंदी असतात. याशिवाय त्यांचा इतर लोकांशी चांगला संपर्क देखील असतो. कुत्रा पाळल्याने तुमच्या शरीराची हालचाल होते. आणि हालचाल झाल्याने पोटात असणाऱ्या सूक्ष्म जीवांची हालचाल होते.

 

आपण पाहतो,एकटे एकटे राहणाऱ्या लोकांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण अधिक अधिक असतं. मात्र जर या लोकांनी ‘कुत्रा’ पाळला तर ही मंडळी कुत्र्यांमध्ये रमून जातात. ‘कुत्र्यां’ची देखभाल करण्यात त्यांना आनंद वाटतो. शिवाय ते कुत्र्यांशी बातचीत देखील करत असतात. या गोष्टीतून आनंद मिळतो. आणि हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण फार कमी होते.

 

२००१ पासून स्वीडनमध्ये कुत्रा पाळायचा झाल्यास सर्वप्रथम त्याची सरकारी कार्यालयात नोंद करावी लागते. एवढंच नाही तर एखाद्याने रुग्णालयाला भेट दिल्यास त्याची नोंद देखील ठेवली जाते.

स्विडनच्या काही शास्त्रज्ञांनी २००१ ते २०१२ या कालावधीतल्या डेटाचा अभ्यास केला. आणि त्यातून त्यांनी हे निष्कर्ष काढून लोकांसमोर मांडले आहेत.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.