World Cup squad:चहल,धवनला का ‘डच्चू’ दिला? अश्विन,आणि चहरला का संधी मिळाली? काय आहेत कारणे? वाचा सविस्तर

ओमान आणि यूएईमध्ये होणाऱ्या t20 World cup साठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. टी-ट्वेण्टी वर्ल्डकप संघात कोण-कोणत्या खेळाडूंची वर्णी लागणार? आणि कोणा-कोणाला डच्चू मिळाणार? याची प्रतिक्षा गेल्या काही दिवसांपासून क्रिकेट चाहत्यांना लागून राहिली होती.

१७ ऑक्टोंबर पासून सुरु होणाऱ्या ‘टी-ट्वेण्टी वर्ल्डकप’साठी निवडलेल्या भारतीय संघात काही आश्चर्यकारक निर्णय घेण्यात आले आहेत.

 

‘मिस्टर’आयसीसी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘शिखर धवनला’ भारतीय संघात स्थान मिळाले नाही. निवड समितीचा हा एक आश्चर्यकारक निर्णय असल्याचं बोललं जातंय.

‘शिखर धवन’ने आतापर्यंत तीन आयसीसी टूर्नामेंट खेळल्या आहेत. त्यात त्याने १८ सामने खेळले असून तब्बल ६६.५६च्या सरासरीने धावा केल्या आहेत. तरीसुद्धा त्याची संघात निवड ‘न’ झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

शिखर धवनला का’डच्चू’दिला?

मिस्टर आयसीसी म्हणून ओळख असून देखील संघात ‘शिखर धवनला’ का संधी मिळाली नाही? या प्रश्नाचे उत्तर देताना निवड समितीचे अध्यक्ष ‘चेतन शर्मा’ म्हणाले, शिखर धवन एक उत्कृष्ट खेळाडू आहे. यात कसलीही शंका नाही. मात्र ‘पावर प्ले’मध्ये आम्हाला जलदगतीने धावा काढणाऱ्या खेळाडूची गरज आहे. आणि शिखर धवनचा बॅटिंग अप्रोच पाहिला तर त्याचे आम्हाला या संघात स्थान दिसत नाही. म्हणून आम्ही त्याच्या ऐवजी ‘केएल राहुल’ला पसंती दिली असल्याचे चेतन शर्मा यांनी सांगितले.

युजवेंद्र चहलला का वगळले?

शिखर धवनची भारतीय संघात निवड होईल की नाही? याविषयी थोडीफार शंका होती. मात्र युजवेंद्र चहलला भारतीय संघात स्थान मिळणार नाही,असं क्रिकेट चाहत्यांना स्वप्नातही वाटलं नसेल. मात्र ‘युजवेंद्र चहल’ ऐवजी मुंबई इंडियन्सच्या ‘राहुल चहर’ला निवड समितीने पसंती दिल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

 

युजवेंद्र चहलला भारतीय संघातून का बाहेर करण्यात आले? या प्रश्नाचे उत्तर देताना निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा म्हणाले, ‘राहुल चहर’ ‘युजवेंद्र चहल’पेक्षा अधिक वेगाने चेंडू फेकतो,आणि म्हणून ‘चहल’ ऐवजी ‘चहरला’ संधी देण्यात आली आहे.

चेतन शर्मा’ने रविचंद्रन अश्विनच्या निवडीचे कारण केले स्पष्ट!

भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये सुरु असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत अद्याप एकाही सामन्यात ‘अश्विन’ला संधी देण्यात आली नाही. सर्व स्तरातून टीका होउन देखील ‘अश्विन’ला संधी दिली गेली नसल्याने,क्रिकेट चाहते चांगलेच संतपल्याचे दिसून आले होते.

‘आयपीएल’मध्ये अश्विनने जबदस्त गोलंदाजी केली होती. तेव्हा पासून आश्विनची भारताच्या टी-ट्वेण्टी संघात निवड केली जाऊ शकते अशी शक्यता अनेकांनी वर्तवली होती. मात्र ‘कसोटी क्रिकेट’मध्ये एवढा जबरदस्त रेकॉर्ड असूनही अंतिम अकरामध्ये अश्विनला स्थान दिलं गेलं नाही. आणि म्हणून मग अश्विनची भारताच्या टी-ट्वेण्टी संघात निवड होऊ शकते याची शक्यता फार कमी होती.

अचानक अश्विनची निवड झाल्याने या निवडीचे कौतुक होताना दिसत आहे. अॉफस्पिनर ‘वॉशिंग्टन सुंदर’ला दुखापत झाल्याने भारताकडे अश्विन व्यतिरिक्त दुसरा कोणताही अॉफस्पिनर उपलब्ध नव्हता. शिवाय अश्विनचा सध्याचा फॉर्म भन्नाट असल्यानेच त्याची भारतीय संघात निवड केली गेली.

अश्विनच्या निवडीचे कारण स्पष्ट करताना ‘चेतन शर्मा’ म्हणाले, ‘यूएई’च्या खेळपट्ट्या नेहमी स्पिन गोलंदाजांना अनुकूल असतात. खासकरून या खेळपट्टीवर ऑफस्पिनर आपल्या संघासाठी ˈअसेट्’ ठरु शकतो. आणि म्हणून आम्ही अश्विनला संघात स्थान दिले आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.