IPL 2021: धोनीचा सोनेरी केस असलेला’रॉकस्टार’लूक सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ!
IPL 2021 : ‘कॅप्टन कूल’म्हणून परिचित असणारा भारताचा माजी कर्णधार,महेंद्रसिंग धोनीने क्रिकेटच्या मैदानावर अनेक विश्व विक्रम आपल्या नावावर केले. शांत स्वभाव आणि खेळाविषयी माहीत असणाऱ्या डावपेचामुळे महेंद्रसिंग धोनीची एक वेगळी ओळख निर्माण झाली. क्रिकेटच्या मैदानावर धोनीच्या डावपेचाचे जेवढे दिवाने होते,तेवढेच त्याच्या हेअर स्टाईलचे देखील अनेक दिवाने असल्याचे आपल्याला दिसून येते. महेंद्रसिंग धोनीची सध्या अशीच एक ‘हेअर स्टाईल’सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असल्याचे पाहिला मिळत आहे. (IPL 2021: On the cricket field, Dhoni’s tactics are as crazy as his hairstyle.)
‘कॅप्टन कूल’ म्हणून परिचित असणारा भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने क्रिकेटमध्ये अनेक विक्रम आपल्या नावावर केले. आयसीसीच्या तिन्हीं ट्रॉफी जिंकणारा महेंद्रसिंग धोनी एकमेव भारतीय कॅप्टन बनला. क्रिकेट विषयी असणारा त्याचा अभ्यास,गेम प्लॅन या गोष्टींचं दिग्गज समालोचक,क्रिकेटर्सनी अनेकवेळा धोनीचं कौतुक केल्याचं आपण अनेकदा पाहिलंय. प्रत्येक खेळाडू कडून आपला बेस्ट खेळ काढून घेण्यात धोनी मातब्बर होता. प्रचंड ‘पॉपुलरटी असून देखील लाईमलाईटमध्ये न राहता आपलं खाजगी आयुष्य खूप साध्या पद्धतीने जगल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये आणखीन भर पडली. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत धोनीचे चाहते आपल्याला जगभरातून पाहायला मिळतात.
दुबईमध्ये 19 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आयपीएल२०२१ च्या उर्वरित भागाचं प्रमोशन करताना महेंद्रसिंग धोनी एका अनोख्या अंदाजात दिसून येत आहे. इंडियन प्रीमियर लीगचे अधिकृत ब्रॉडकास्टर्स,स्टार स्पोर्ट्सने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून धोनीचा रॉकस्टार लूक असणारा,सोनेरी केस असणारा एक व्हीडिओ पोस्ट केला असून,सध्या तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
🗓️ The dates are OUT!
Get ready for the #VIVOIPL extravaganza in the UAE 🇦🇪
FULL SCHEDULE 👇 pic.twitter.com/8yUov0CURb
— IndianPremierLeague (@IPL) July 25, 2021
“स्टार पोर्टसाठी’धोनीने 44 सेकंदाची केलेली ही जाहिरात क्रिकेट चाहत्यांना आणि धोनीच्या चाहत्यांना प्रचंड आवडत असल्याचे पाहायला मिळत आहे.
Grab your 🍿 & fasten your seatbelts, #VIVOIPL 2021 is BACK!
Don't miss the action, kyunki #AsliPictureAbhiBaakiHai!
Starts Sep 19 | Star Sports Network & Disney+Hotstar pic.twitter.com/AYNwMdlOk3
— Star Sports (@StarSportsIndia) August 20, 2021
इंटरवल के बाद आएगा दूसरे हाफ का तुफान… पहला हाफ तो झांकी है… वीवो आईपीएल कें दूसरे हाफ का असली पिचर अभी बाकी है। या प्रोमोत महेंद्रसिंग धोनी असे काही भन्नाट बोल बोलताना पाहायला मिळत असून,त्याच्या एक्टींगचे कौतुक देखील केले जात आहे.
सनराईजर हैदराबाद,दिल्ली कॅपिटल्स,कोलकत्ता नाईट रायडर्स या संघातील काही खेळाडू कोरोना पॉझिटिव आल्यानंतर उर्वरित स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. भारतामध्ये कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता आयपीएल २०२१ची उर्वरित स्पर्धा ही दुबईमध्ये खेळवण्यात येणार असल्याचे त्यावेळी जाहीर करण्यात आले होते.
२०२०ला दुबईमध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत महेंद्रसिंग धोनीचा चेन्नई सुपर किंग्स संघ सातव्या क्रमांकावर राहिला होता. २०२०मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या संघावर साखळीत गारद होण्याची पहिल्यांदाच नामुष्की ओढवली होती. मात्र या हंगामात धोनीच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत गुणतालिकेत दुसरा क्रमांक पटकावत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
सात सामन्यात पाच विजयी तर दोन पराभवासह चेन्नई सुपर किंग दुसऱ्या क्रमांकावर आहे. योगायोग म्हणजे आयपीएल २०२१चा पहिला सामना चेन्नई सुपर किंग आणि मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये होणार असल्याने क्रिकेट चाहत्यांना या सामन्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम