IND vs END 2nd Test :दुसरी कसोटी रंगतदार अवस्थेत नाही;कोहलीचा संघ पराभवाच्या छायेत!

IND vs ING: लॉर्डच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यामध्ये सुरु असलेला दुसरा कसोटी सामना रंगतदार अवस्थेत येऊन ठेपला आहे. मात्र दोन्हीं संघांची तुलना केली तर,भारत हा सामना गमावण्याची दाट शक्यता असल्याचं मत क्रिकेट विश्लेषकांनी व्यक्त केलं आहे. (India vs England Test Series 2021, 2nd Test Day 4 Live Score India tour of England 2021 2nd Test match scorecard in marathi)

लॉर्डच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय सलामवीरांनी केलेल्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर पहिल्या डावात भारताने ३६४ एवढी धावसंख्या उभारली. एक वेळ भारतीय संघाने तीन बाद 267 अशी धावसंख्या उभारली होती. मात्र मधल्या फळीने निराशा केली,आणि भारताचा डाव गडगडला. भारतीय सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 126 धावांची सलामी दिली. रोहित शर्मा 83 धावा करून बाद झाला. त्यानंतर राहुलने डावाची सूत्रे आपल्या हातात घेत,विक्रमी शतक झळकावले. राहुल लॉर्ड्सवर शतक झळकावणारा केवळ तिसराच भारतीय सलामवीर ठरला.

 

पहिल्या दोन दिवसाच्या खेळाचा विचार केला तर दुस-या कसोटी सामन्यावर भारतीय संघाचे वर्चस्व होते. मात्र तिसरा दिवस इंग्लंडचा ‘कॅप्टन’ जो रुटने गाजवल्यामुळे आता हा कसोटी सामना इंग्लंडच्या बाजूने थोडासा झुकलेला पाहायला मिळतोय. कॅप्टन जो रूटच्या नाबाद 180 धावांच्या जोरावर इंग्लंडने 27 धावांची आघाडी घेतली.

गेल्या काही सामन्यांचा विचार केला तर भारताची मधली फळी साफ अपयशी ठरल्याचे पाहायला मिळत आहे. पहिल्या डावात जबरदस्त कामगिरी करणारे भारताचे दोन्हीं सलामवीर जर दुसऱ्या डावात अपयशी ठरले तर, भारताच्या मधल्या फळीतले फलंदाज डाव सावरू शकतील का? हा मोठा प्रश्न असल्याने हा सामना इंग्लंडच्या बाजूने झुकल्याचे दिसून येत आहे.

दुसऱ्या कसोटीत देखील रविचंद्रन अश्विनला अंतिम 11 मध्ये स्थान मिळू शकले नसल्याने,क्रिकेट विश्लेषकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. मात्र विराट कोहली आणि मॅनेजमेंटने रविचंद्रन अश्विनला न खेळवण्याचा घेतलेला निर्णय हा ऑफस्पिनर मोईन अलीच्या कामगिरीवर अवलंबून असणार आहे.

दुसऱ्या डावात ऑफस्पिनर मोईन अलीने भारताच्या दोन-तीन फलंदाजांना बाद केले तर,कॅप्टन विराट कोहली आणि मॅनेजमेंटला पुन्हा एकदा टीम निवडीवरून टिकेला सामोरे जावे लागेल.

कसोटीतला चौथा डाव इंग्लंडचे फलंदाज खेळणार असल्याने भारतासाठी हे अडवांटेज असले तरी,पहिल्या कसोटीत आपली झलक दाखवणारा जसप्रीत बुमरा लयीत नाही, ही एक भारतासाठी चिंतेची बाब नक्कीच आहे. त्याचबरोबर जलदगती आणि फिरकीपटू अशा दोन्हीं गोलंदाजांसाठी पोषक असणाऱ्या या खेळपट्टीवर भारत रविचंद्रन अश्विनला नक्कीच मिस करणार आहे.

आणि म्हणून लॉर्ड्स मैदानावर दुसरा कसोटी सामना रंगतदार अवस्थेत येऊन पोहचला आहे. असं वाटत असलं तरी,हा सामना भारतीय सलामीवीर आणि भारताच्या मध्यक्रमावर अवलंबून असणार आहे. त्याचबरोबर जर चौथ्या दिवशी खेळपट्टीने फिरकीपटूंना साथ दिली तर, मोईन अली भारतीय फलंदाजांना आपल्या तालावर नाचायला भाग पाडेल. जर असं झालं तर इंग्लंडचा,मोईन अलीला खेळवण्याचा निर्णय यशस्वी होईल. तर भारताला रविचंद्र अश्विनला न खेळवल्याचा खूप मोठा फटका बसेल. आणि त्याचा परिणाम सामन्यावर होईल.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.