ATM Card कार्ड वापरताय ही चूक करू नका; नाहीतर खूप मोठे नुकसान होऊ शकते.

0

ATM Card: सध्या डेबिट कार्ड ( Debit card ) किंवा क्रेडिट कार्डचे (Credit Card) वापरकर्ते प्रचंड पाहायला मिळतील. डेबिट कार्ड नाही असे खूप कमी लोक असतील. एटीएम कार्डच्या समोरील बाजूवर 16 अंकी क्रमांक आपल्याला पाहायला मिळतो. तो आपला डेबिट किंवा क्रेडिट कार्ड नंबर असतो. बऱ्याच कार्डवर समोरील बाजूस वापरकर्त्याचे नाव देखील पाहायला मिळते आणि कार्डची एक्सपायरी तारीख सुद्धा लिहिलेली असते.

कार्डच्या पाठीमागील एक क्रमांक तुम्हाला पाहायला मिळेल. तो तीन अंकी असतो. बऱ्याच लोकांना या तीन अंकी क्रमांकाचे महत्त्व माहिती नसेल. हा क्रमांक खूप महत्वाचा असतो. आपल्याला बँकेकडून कार्ड मिळाल्यानंर आपण या कर्डवरील तीन अंकी क्रमांक लपवला किंवा पुसून टाकला पाहिजे असे स्वतः रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सांगते. (Why delete this three digit number written on the back of the ATM card, This is the main reason

ATM कर्डवरील पाठीमागील बाजूस असणारा तीन अंकी क्रमांक का महत्वाचा आहे.

क्रेडिट किंवा डेबिट कार्ड यावर पाठीमागील बाजूस असलेला तीन अंकी कोड खूप महत्वाचा असतो. त्याला CVV क्रमांक असे म्हणतात. CVV म्हणजे कार्ड व्हेरिफिकेशन व्हॅल्यू(Card Verification Value) . आपल्या कार्डच्या दृष्टीने व कार्डच्या सुरक्षित तेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असतो . तुम्ही तुमच्या ATM कर्डवरून ऑनलाईन पेमेंट करत असाल तर हा Card Verification Code असल्याशिवाय पुढील पेमेंट होत नाही. तुम्ही एकाच ठिकाणी वारंवार कार्डचा वापर करून पेमेंट करत असाल तरीदेखील तुम्हाला कोड द्यावा लागतो आणि तरच पेमेंट होऊ शकते.

आरबीआय (RBI) म्हणते बँकेकडून तुम्हाला क्रेडिट किंवा डेबिट कार्ड मिळाल्यानंतर तुम्ही लगेच तुमचा CVV क्रमांक पुसून टाका. हे तुमच्या कार्डच्या सुरक्षित तेच्या दृष्टीने फार महत्वाचे पाऊल आहे. कारण जर तुमच्या कार्डचा फोटो कोणाकडे असेल तरीदेखील त्यावर CVV क्रमांक नसेल तर तुमच्या कार्डचा कोण गैरवापर करू शकणार नाही.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.