Tokyo Olympics 2020: रवी कुमार दहियाने मिळवले रौप्य पदक

Tokyo Olympics 2020  : जपान मधील टोकियो येथे  सुरु असलेल्‍या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताला  आज  (गुरुवारी) नव्या पदकाची भर पडली आहे.  पैलवान रवी दहिया (Ravi Kumar Dahiya) यांना  सुवर्णपदकाने हुलकावणी दिली असली तरी त्यांनी सिल्वर पदक मिळवले. रवी दहिया यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर अंतिम समण्यापर्यंत मजल मारली होती. अर्थातच त्यांच्याकडून गोल्ड मेडल भारताला मिळेल अशी आशा होती. परंतु रवीचा थोडक्यात पराभव झाला व दोन वेळ विश्वविजेता ठरलेला रशियाचा खेळाडू जावूर युगुयेवन याला गोल्ड मेडल मिळालं. वेळेची मर्यादा असल्याने रवी यांना ३ गुण कमी पडले व ७-४ अशा चुरशीच्या लढतीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
(Tokyo Olympics 2020: Indian Wrestler Ravi Dahiya defeated in wrestling Final against zaur uguev Still secure silver medal for india )

 रवि कुमार दाहिया यांनी यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्ध्येमधील ५ वे पदक देशाला मिळवून दिले आहे. पुरुष फ्रीस्टाइल 57 किलो वजन गटामध्ये  रवी कुमार दहीया यांनी हे यश मिळवलं आहे.त्यांनी उपांत्य फेरीमध्ये कझाकिस्तानच्या सनायेव नुरिस्लामला याच्यावर मात करून अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवला होता.  रवी यांनी सिल्वर मेडल (रौप्य पदक) जिंकल्याचे जाहीर होताच  हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी रवी यांना चार कोटी रुपयाचे बक्षिस देण्याचे जाहीर केले आहे. देशाचे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील रवी कुमार दहिया यांचे “रवि कुमार दहिया एक उत्कृष्ट पैलवान आहे. टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये सिल्वर मेडल  जिंकल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. रवी कुमार यांचा भारताला त्यांचा अभिमान आहे”, अशा शब्दांत रवी कुमार दाहीया यांचे कौतुक केले.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.