अकलूज नगरपरिषद तर नातेपुते  नगरपंचायत; मोहिते पाटील यांनी मारली बाजी. (Akluj Nagarparishad, Natepute Nagarpanchayat)

गेले अनेक दिवस नातेपुते नगरपंचायत (Natepute Nagarpnachayt) व अकलूज- माळेवाडी नगरपरिषद (Akluj Nagarparishad) हा मुद्दा चांगलाच गाजत होता. विजयसिंह मोहिते पाटील यांनी ही लढाई मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन जिंकली. कोर्टाने तातडीने वरील ग्रामपंचायतींना नगरपंचायत व नगरपरिषद  यांचा अंतिम अध्यादेश काढून त्याबाबत कळवण्यात यावे असा आदेशच महाराष्ट्र राज्य सरकारला दिला होता. ही लढाई मोहिते पाटील यांनी उपोषणाच्या जोरावर जिंकली आहे. मोहिते पाटील गटाने या कामासाठी वारंवार पाठपुरावा केला होता. ( Government Of Maharashtra declare about  Akluj Municipal Council, Natepute Nagarpanchayat )

अकलूज येथील उपोषणाला विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, चित्रा वाघ, माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, अा. प्रशांत परिचारक, माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते यांनी पाठिंबा देऊन अकलूज नगरपरिषद व नातेपुते नगरपंचायत बाबत पाठिंबा जाहीर केला होता.  याबाबत विजयसिंह मोहिते पाटील,( Vinaysinh Mohite Patil) सोलापूर जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख,(Babaraje Deshmukh)  नातेपुतेचे सरपंच, उपसरपंच, मामासाहेब पांढरे, व स्थानिक नेतेमंडळी यांनी राज्यपाल भगतसिंह  कोष्यारी व नगरविकासमंत्री मोहिते पाटील यांना जाऊन भेटले होते.

अजित पवार यांचा विरोध असताना देखील नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी अकलुज नगरपरिषद व नातेपुते नगरपंचायत मंजुरी देण्याबाबत निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. गेले अनेक दिवस मोहिते पाटील गट अकलूज  नगरपरिषदमध्ये व नातेपुते नगरपंचायत मध्ये रुपांतरीत करण्यासाठी प्रयत्न करत होते. 22 जून पासून  तब्बल ४३ दिवस अकलूज येथे मोहिते पाटील गटाकडून उपोषण चालू होते. अनेक नेत्यांनी त्या ठिकाणी जाऊन त्यांना पाठिंबा दर्शवला होता. शासनाच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत असून मिठाई वाटून व फटाक्यांची आतशबाजी करून जल्लोष करण्यात आला.

नातेपुते सी अकलूज बाबतचा निर्णय फडणवीस सरकारने मंजूर केला होता. राज्यात सत्तांतर होऊन महविकास आघाडीचे सरकार आले. लोकसभा निवडणुकीपूर्वी विजयसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याचाच राहत मनात धरून नातेपुते परिषद व अकलूज नगरपंचायतबाबतचा निर्णय घेण्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जबाबदार असल्याचा आरोप मोहिते पाटील यांनी केला होता. अकलूज परिसरातील शिवसेना, काँग्रेस हे पक्ष देखील मोहिते पाटील यांच्या पाठीशी उभे राहिल्याने आंदोलनाला देखील फायदा झाला.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे असतील किंवा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीगाठी घेण्यास सुद्धा शिवसैनिक मोहिते पाटील यांच्यासोबत होते. त्यामुळेच काल नातेपुते व अकलूज बाबत अध्यादेश काढण्यात आला. मोहिते पाटील यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर मात केली असल्याची प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.