Tokyo Olympic 2021: महाराष्ट्राचा प्रवीण जाधवचा पराभव पण पठ्ठ्या सडेतोड भिडला; त्याच्याबद्दल थोडंसं….
महाराष्ट्रातील सातारा मधील फलटण तालुक्यातील सरडे या गावचा रहिवाशी असणारा प्रवीण जाधव. त्याच्या घरची परिस्थिती बेताचीच. त्या परिस्थितीला हरवत प्रवीण आज एवढ्या उंच शिखरावर पोहोचला. वयक्तिक तिरंजादी स्पर्धेमध्ये प्रवीणला पराभव स्वीकारावा लागला असला तरी महाराष्ट्रासह देशात प्रविणचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. सरडे गावाचे नाव देशामध्ये झलकवले. (Tokyo Olympic 2021)
वयक्तिक तिरंजादी स्पर्धेत जगातील दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या आरओसी टीमच्या बजारझापोव याला ६-० ने पराभवाची धूळ चारली. दुसऱ्या राउंडमध्ये अमेरिकेच्या जगातील पहिल्या स्थानावर असलेला तिरंदाज एलिसन ब्राडीकडून प्रवीणला पराभव पत्करावा लागला व प्रवीण ऑलिम्पिक स्पर्धतून बाहेर पडला. प्रवीणला एलिसन ब्राडीकडून १/१६ असा पराभव स्वीकारावा लागला. महाराष्ट्राचा हा पठ्ठ्या हारला असला तरी त्याने झुंज वाघासारखी दिलीय. पठ्ठ्याने एवढा संघर्ष केला आहे की त्याचे महाराष्ट्रात देशात सर्वत्र कौतुक केले आहे.[Tokyo Olympics 2021 Archery Player Pravin Jadhav (India) lost Alimen Brado defeated her ]
खासदार उदयनराजे म्हणतात, “सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील सरडे गावातील एका मजूर आईवडिलांच्या पोटी जन्मलेल्या प्रवीण जाधव याची ऑलिम्पिकसाठी निवड होते आणि बघता बघता आपल्या अतुलनीय कामगिरीच्या व कष्टाच्या जोरावर जगातील उत्कृष्ट अंतिम सोळा खेळाडूंमध्ये प्रवेश करून क्रमांक एक वर असलेल्या खेळाडूला टक्कर देतो पण काही कारणास्तव पराभूत झालेल्या प्रवीण चे कौतुक करावे तेवढे कमीच.” अशा शब्दात त्यांनी प्रवीणचे कौतुक केले आहे.
प्रवीणचा ऑलिम्पिक पर्यंतचा संघर्षमय प्रवास:
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील सरडे या गावातील रहिवाशी असणारा प्रवीण जाधव. प्रवीनच्या घरची परिस्थिती पाहता अत्यंत बेताची आहे. वडील सेन्ट्रिंगच्या कामावर जातात तर आई शेतमजूर आहे.
हातावर पोट असणारे हे जाधव कुटुंब आहे. आई वडील मोलमजुरी करत असल्यामुळे प्रवीणने देखील गावातील कपड्याच्या दुकानात काम करावे अशी त्याच्या आईवडिलांची ईच्छा होती. परंतु त्याला माहिती होते, आपल्या कुटुंबाला या परिस्थतीतून बाहेर काढण्यासाठी एकमेव हा मार्ग आहे.
सुरुवातील अमरावती येथे असणाऱ्या क्रीडा प्रबोधिनी येथे प्रवेश मिळाला होता. त्या ठिकाणी प्रवेश मिळवण्यासाठी त्याचे प्राथमिक शिक्षक विकास भुजबळ व शुभांगी भुजबळ यांनी खूप मेहनत घेतली. अमरावती येथील क्रीडा प्रबोधनीला गेल्यानंतर तेथे प्रवनला दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था होत नव्हती. अशा काळात कितीतरी वेळा चक्कर येऊन पडायचा. प्राथमिक शिक्षक विकास भुजबळ यांनी त्याच्या आहाराची जबाबदारी घेतली. बांबूपासून तयार केलेल्या धनुष्य बानाने खेळायला सुरुवात केली होती. नंतरच्या काळात प्रवीणने देदीप्यमान यश मिळवायला सुरुवात केली. आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत टाकत प्रवीणने पुढे झेप घ्यायला सुरुवात केली.
प्रवीण सुरुवातीला ४०० मीटर, ८०० मीटर रानिंग स्पर्धेत सहभाग घेत होता. त्याला तालुका, जिल्हा पातळीवर रनींग स्पर्धेत मेडल मिळाली आहेत. त्याच्या आजपर्यंतच्या प्रवासात त्याच्या प्रशिक्षकांची देखील तेवढीच मेहनत असल्याचे प्रवीण सांगतो. नेदरलॅंड येथे झालेल्या स्पर्धेत सांघिक रौप्य पदक मिळवले व त्यामुळेच त्याचे ऑलिम्पिक मध्ये सीलेक्शन झाले.
प्रवीणने केलेला संघर्ष महाराष्ट्रातील नाही तर देशातील तरुणांना प्रेरणा देणारा आहे. आजकाल तरूण छोट्या छोट्या गोष्टीवरून आत्महत्या करत आहेत. संयम आयुष्यात किती महत्वाचा असतो ते आपल्याला प्रवीणच्या रूपाने पाहायला मिळेल. आपल्या परिस्थितीला आपले गुलाम बनवा परिस्थितीचे गुलाम बनू नका ह्या वाक्याला शोभेल असा प्रवीण व त्याचे कर्तृत्व आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.