Rich Ministers: मोदी मंत्रीमंडळामध्ये ७० टक्के मंत्री करोडपती

Rich Ministers in Indian Politics:  नुकताच मोदी सरकारने आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला आहे. या मंत्रिमंडळात अनेकांना पायउतार होऊन नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे व काहींच्या बाबतीत खाती बदलून देण्यात आली आहेत. मोदी सरकार मंत्रिमंडळामध्ये मध्ये मध्यंतरी ४३ मंत्र्यांनी शपथ घेतली असून एकूण ७८  एवढी संख्या झाली आहे. मंत्रिमंडळात बरेच मंत्री हे करोडपती आहेत. साधारण ७० टक्के मंत्री हे करोडपती आहेत. ( Rich Ministers in Indian Politics: In Modi’s cabinet, 70 per cent of the ministers are millionaires.)

नुकतीच केंद्रीय सहकारमंत्री पदाची जबाबदारी दिलेले गृहमंत्री  अमित शहा हे सर्वात श्रीमंत केंद्रीय मंत्री आहेत. त्यांची एकूण मालमत्ता ४० कोटी रुपये आहे.
त्याचसोबत केंद्रीय संरक्षणमंत्री पदाची जबाबदारी योग्य रित्या पार पाडणारे राजनाथ सिंह हे देखील करोपती मंत्री आहेत.  त्यांची संपत्ती ५ कोटींपेक्षा  अधिक आहे.  केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे देखील करोपडती आहेत. त्यांची एकूण संपत्ती ६ कोटींपेक्षा जास्त आहे.

नुकतीच पियूष गोयल यांना रेल्वेमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले व त्यांच्या जागी अश्विनी वैष्णव यांची नियुक्ती करण्यात आली. अश्विनी वैष्णव हे  राज्यसभेचे सदस्य आहेत. ते ओडिसा केडरचे IAS देखील होते. त्यांचा जन्म हा राजस्थानमध्ये झाला आहे. त्यांची संपत्ती १ कोटींपेक्षा जास्त आहे.

नागरी उड्डाण मंत्री पदावरून पायउतार झालेले व   नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारत पेट्रोलियम मंत्री म्हणून निवड झालेले हरदिपसिंग पुरी यांची देखील संपत्ती करोडोंच्या घरात आहे. त्यांची संपत्ती २२ कोटींपेक्षा अधिक आहे. नुकतेच पेट्रोलियम मातृ पदावरून पायउतार झालेले व सध्याचे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यांची एकूण संपत्ती ३ कोटींपेक्षा अधिक असून त्यांच्यावर ८९ टक्के कर्जदेखील आहे.

वरील सर्व माहिती ही निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरील आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.