भारतात Tik Tok पुन्हा येणार?

प्रसिद्ध चिनी व्हिडीओ शेअरिंग अॅप TikTok लवकरच पुन्हा एकदा भारतात पदार्पण करण्याची  शक्यता आहे. Tiktok ने नियमांचे उल्लंघन केल्यामुळे टोक वर भारतात बंदी घालण्यात आली होती. PUBG प्रमाणे नवीन  नाव आणि वेगळ्या लूकसह टिकटॉक भारतात लॉन्च केलं जाऊ शकतं. मिळालेल्या माहितीनुसार TikTok चे मालकी  असलेली कंपनी ByteDance ने आपल्या शॉर्ट व्हिडीओ अॅपच्या नव्या ट्रेडमार्कसाठी तयारी सुरू केली आहे.

गेल्या वर्षी जून महिन्यामध्ये  केंद्र सरकारने 56 चिनी अॅपवर भारतात बंदी घातली होती.  टिकटॉकसह इतर अॅपचा यामध्ये  समावेश होता. सरकारकडून  बंदी घातल्यानंतर टिकटॉक सर्वच अॅप स्टोअरवरुन काढून टाकण्यात आले होते.

टिप्स्टर मुकुल शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, TikTok (टिक टोक) या ऐप ची मालकी  असलेली कंपनी ByteDance द्वारे 6 जुलै रोजी फाईल करण्यात आलेल्या या नव्या ट्रेडमार्कमध्ये TikTok ची स्पेलिंग बदलण्यात आली आहे.  कंपनीकडून जुने Tik Tok  बदलून TickTock या नावाने ट्रेडमार्क मिळण्यासाठी  अॅप्लिकेशन देण्यात आले आहे.

पुन्हा भारतीय बाजारात आपले पाऊल ठेवण्यासाठी भारत सरकारसोबत चर्चा सुरु

ByteDance ही  आपलं अॅप भारतात पुन्हा लॉन्च करण्यासाठी केंद्रसोबत  चर्चा करत असल्याची माहिती महाराष्ट्र लोकशाहीच्या हाती लागली आहे.   ByteDance कंपनीकडून  केंद्र सरकारला विश्वास दिला आहे की, कंपनी नवीन नियमांचे पालन करेल व आयटी नियमांचं पालन कंपनी करेल. दरम्यान, ByteDance कंपनीने ने 2019 मध्ये बॅन होण्यापूर्वीच भारतामध्ये आपला चीफ नोडल (Chief Nodal) आणि ग्रीवेन्स ऑफिसर या दोन्ही अधिकाऱ्यांची नियुक्ती केली गेली होती. हे दोन्ही अधिकारी नव्या आयटी नियमांच्या महत्त्वाच्या अटीनुसार नेमावे लागत आहेत.

बॅन होण्यापूर्वी TikTok चे भारतीय बाजारपेठेत  20 कोटी युजर्स  होते. शॉर्ट व्हिडीओ अॅप TikTok भारतात अल्पावधीतच   पॉप्युलर झाला  होता. त्याचे फीचर्स वापरकर्त्यांना हाताळायला देखील खूप सोपे होते.  टिकटॉक बॅन करण्यात आले होते, तेव्हा  देशात Tik Tok चे   20 कोटी युजर्स  होते. TikTok बॅन झाल्यानंतर  फेसबुकच्या इंस्टाग्राम आणि YouTube ने या संधीचा फायदा उठवला व याच पार्श्वभूमीवर नवं फिचर या तिन्ही अॅपने  लॉन्च केलं होतं. इंस्टाग्रामकडून Reels आणि YouTube कडून  Shorts च्या नावाने युजर्ससाठी नवीन शॉर्ट व्हिडीओ पोस्ट करण्यासाठी फिचर देण्यात आले आहे. जो

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.