महाविकास आघाडीमध्ये बिघाडी.अमोल कोल्हे व आढळराव पाटील यांच्यात शाब्दिक चकमक

0

गेले काही दिवस महाविकास आघाडी मध्ये बिघाडी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे देखील स्वबळावर निवडणूक लढण्याचे वक्तव्य वारंवार करत आहेत. नुकतीच अमोल कोल्हे व शिवसेना माजी खासदार आढळराव पाटील यांच्यामध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळत आहे.

“अमोल कोल्हे यांनी अकलेचे तारे तोडत उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी शरद पवार यांच्या आशीर्वादाने आहेत असे विधान केले आहे. हे बोलण्याची अमोल कोल्हे यांची उंची आहे का? असा टोला अमोल कोल्हे यांना  माजी खासदार आढळराव पाटील यांनी लगावला आहे. पुढे बोलत असताना आढळराव पाटील म्हणाले  कोल्ह्याने उंटाच्या पार्श्वभागाचा मुका घेऊ नये, आपली लायकी काय? आपण बोलतो काय?”   “शिवसेनाप्रमुख आणि उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला मोठं केलं आहे. तुम्ही जरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खासदार जरी असाल, तरी तुम्हाला प्रकाश झोतात आणण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केले आहे.” अशी टीका माजी खासदार आढळराव पाटील यांनी कोल्हे यांच्यावर केली

शिरूर लोकसभा मतदारसंघामधील विकास कामांच्या श्रेयवादावरून  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी  आणि शिवसेना पक्षामध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. या निमित्ताने महविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागला आहे. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या कामाच्या श्रेयावरून राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आणि शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली असून, एकमेकांच्यावर  जोरदार टीकास्त्र सोडत असल्याचे पाहायला मिळत आहे.

या पार्श्वभूमीवर बोलत असताना शिवसेनेचे शिरूर विधानसभा मदारसंघाचे माजी खासदार आढळराव पाटील म्हणाले की, “मी खासदार नाही ठीक आहे, पण पुणे – नाशिक बायपास, नारायणगाव या रस्त्याच्या उद्घटनाच्या वेळी मला  फोन तरी करायचा, निमंत्रण द्यायचं. या माणसामुळे काम झालं आहे. यांना बोलवावं. या रस्त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये राष्ट्रवादी सोडून इतर नेत्यांचे फोटो नाहीत. माझी एवढीच  अपेक्षा होती की, माझ्या मुख्यमंत्र्यांचा फोटो आला पाहिजे होता आणि मला या कार्यक्रमाला निमंत्रण द्यायला पाहिजे होतं.” असे  देखील आढळराव पाटील  माध्यमांशी बोल असताना म्हणाले.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.