…अशी कामगिरी करणारा’पृथ्वी शॉ’दुसरा भारतीय

भारतीय संघातून डच्चू मिळाल्यानंतर पृथ्वी ‘शॉ’ने सय्यद मुस्ताक अली आणि विजय हजारे स्पर्धेत अक्षरशः खोर्‍याने धावा काढल्या. विजय हजारे आणि सय्यद मुस्ताक अली स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केल्यानंतर पृथ्वी ‘शॉ’ आयपीएलमध्ये देखील आपला जलवा दाखवताना दिसून येत आहे.

आयपीएल अगोदर झालेल्या ‘विजय हजारे स्पर्धेत’ पृथ्वी ‘शॉ’ने आठ सामन्यात 165.40च्या सरासरीने 138.29च्या स्ट्राईक रेटने तब्बल 827 हवा कुठल्या. पृथ्वी ‘शॉ’ने या स्पर्धेत 4 शतक आणि एक अर्धशतक झळकावत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. विशेष म्हणजे त्याने या स्पर्धेत एक द्विशतक देखील झळकावण्याचा कारनामा केला होता.

विजय हजारे स्पर्धेतला हाच फॉर्म त्याने आयपीएलमध्ये देखील दाखवत प्रतिस्पर्धी गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडलं आहे. कोलकत्ता नाइट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये काल खेळलेला सामना तर पृथ्वी ‘शॉ’ ने दिल्लीला एकहाती जिंकून दिला.

 

पृथ्वी शॉ ने या सामन्यात दोनशेच्या स्ट्राईक रेटने, 41चेंडूत 82 धावा कुटल्या. यात तब्बल 11 चौकार तर 3 षटकारांचा समावेश आहे. पृथ्वी’शॉ’ने केलेल्या धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्स संघाने १६.३षटकातच कलकत्ता नाईट रायडर्सवर विजय मिळवला.

पृथ्वी ‘शॉ’ने पहिल्याच षटकात शिवम मावीला सलग सहा चेंडूत सहा चौकार ठोकण्याचा विक्रम केला. असा कारनामा करणारा पृथ्वी शॉ आयपीएल मधला तिसराच फलंदाज ठरला आहे. यापूर्वी असा कारनामा अजिंक्य रहाणे आणि लूक राईट यांच्या नावावर आहे.

 

https://www.instagram.com/p/COQYzfVh-Nx/?igshid=1w6thh1i8t5wj

पृथ्वी ‘शॉ’ने 18 चेंडूत अर्धशतक झळकावत या स्पर्धेतील फास्टेस्ट फिफ्टी करण्याचा रेकॉर्ड देखील आपल्या नावावर केला आहे. पृथ्वी ‘शॉ’ या स्पर्धेतील हायेस्ट रन ग्रेटर यादीत आता तिसऱ्या क्रमांकावर येऊन पोहोचला असून भारतीय निवड समितीचे आता त्याच्या खेळाकडे लक्ष असणार आहे.

 

https://www.instagram.com/p/COQb28qF-RM/?igshid=4nxmh2sjan1x

भारतीय संघातून ड्रॉप झाल्यानंतर पृथ्वी ‘शॉ’ने बॅटिंग कोच प्रवीण आमरेंबरोबर काम केले. प्रवीण आमरेंबरोबर काम केल्यानंतर पृथ्वीने खोर्‍याने धावा काढायला सुरुवात केली. माझ्या फलंदाजीचे सगळे श्रेय प्रविण आमरे़ सरांना जातं,असं पृथ्वीने यापूर्वीही बोलून दाखवलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून पृथ्वी’शॉ’ने केलेल्या कामगिरीच्या जोरावर तो लवकरच भारतीय संघात आपले स्थान परत मिळवेल,अशी आशा आता त्याच्या चाहत्यांना असणार आहे. येणाऱ्या काळात पृथ्वी कशी कामगिरी करतो,हे पाहणं खूप औत्सुक्याचे ठरणार आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.