राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी’पाणी’चोर आहे;राम सातपुते

उजनी धरणाचे पाणी इंदापूरला नेल्यामुळे,माळशिरस तालुक्याचे, भाजपचे आमदार ‘राम सातपुते’ अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत असून,’राष्ट्रवादी कांग्रेस ‘पाणी’चोर आता हेच समीकरण बनल्याचा घणाघात त्यांनी आपल्या ट्वीटरच्या माध्यमातून केला आहे.

मुख्यमंत्र्याच्या सहमतीने सांडपाण्याचा नावाखाली उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी इंदापूरला नेल्याने सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर माध्यमातून जोरदार टीका झाली होती. अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली. एवढंच नाहीतर दत्तात्रय भरणे यांना काळे झेंडे देखील दाखवण्यात आले होते.

अनेकांकडून मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर दत्तात्रय भरणे यांनी उजनी धरणाच्या पाण्याविषयी भाष्य करताना म्हटले,सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचं एक थेंब जरी पाणी इंदापूरला नेल्याचे सिद्ध करून दाखवले तर,मी राजकीय संन्यास घेईन असं स्पष्ट केलं.

 

उजनी धरणाचे पाणी सोलापूर जिल्ह्यातील ‘टेलएन्डच्या’ तालुक्यांना पूर्ण क्षमतेने कधी मिळणार? या प्रश्नाचे उत्तर चाळीस वर्षापासून अद्यापही मिळालेले नाही. दहीगाव उपसा सिंचन योजना सोडली,तर बॅकवॉटरपासून पाच किलोमीटरपर्यंत सुद्धा उजनी धरणाचे पाणी पोचलेले नाही. ही वस्तुस्थिती आहे. मात्र या धरणाचे पाणी बारामती आणि इंदापूर तालुक्याला सहज उपलब्ध होतं,हे आमच्यावर खुप मोठा अन्याय असल्याचं जिल्ह्यातील अनेकांनी अनेक वेळा बोलून दाखवलं आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून उजनी धरणाच्या पाणी वाटपावरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होताना सातत्याने पाहायला मिळतात. तरीदेखील उजनी धरणाच्या पाण्याचा विषय अद्यापही मिटलेला आहे. नुकतेच सांडपाण्याच्या नावाखाली पाच टीएमसी पाणी दत्तात्रेय भरणे यांच्या प्रयत्नातून इंदापूरला नेण्यात आले,आणि उजनीच्या पाण्याचा विषय पुन्हा एकदा ज्वलंत झाला.

उजनीचे पाच टीएमसी पाणी इंदापूरला नेल्याचा निर्णयावरून सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय यांना जोरदार टीकेला सामोरं जावं लागलं, विरोधकांनी देखील या निर्णयावर टीका करताना कोणतीही कसर सोडली नाही. भारतीय जनता पार्टीचे माळशिरसचे आमदार युवा आमदार राम सातपुते यांनीदेखील या निर्णयावर जोरदार टीका केली आहे.

 

सोलापूर जिल्ह्याचा हक्काचं पाणी आधी बारामतीला,आणि आता इंदापूरला,पळवलं! सत्तेच्या जोरावर घेतलेले अत्याचारी निर्णय फार काळ टिकत नसतात. “राष्ट्रवादी काँग्रेस पाणी चोर” हेच समीकरण आता बनले आहे. असा घनाघात राम सातपुते यांनी अजित पवार आणि दत्तात्रय भरणे यांच्यावर केला आहे. यापुढे आता संघर्ष करू,पण सोलापूरचं हक्काचं पाणी चोरू देणार नसल्याचा इशारा देखील राम सातपुते यांनी आपल्या ट्विटर अकाउंट करून दिला आहे.

उजनी धरणाच्या पाण्याचा प्रश्न येणाऱ्या काळात आणखी चिघळण्याची शक्यता असून, उजनी ग्रस्तांना त्यांच्या हक्काचा पाणी कधी मिळणार? हे पाहणं खूप औत्सुक्याचे ठरणार आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.