अर्थसंकल्पीय अधिवेशादरम्यान भाजपचे आमदार राम सातपुते यांनी विज बिलाच्या प्रश्नावर राज्य सरकारला चांगलेच घेरल्याचे पाहायला मिळाले होते. वाढत्या वीज बिलाविरोधात माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी थेट विधीमंडळ परिसरात चक्क मोटर स्टार्टर,वायर गळ्यामध्ये लटकावून महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध करत सगळ्यांचे लक्ष वेधून घेत, कमालीचे चर्चेत आले होते.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील ‘राम सातपुते’तालुक्याच्या विविध समस्या अध्यक्षासमोर मांडताना दिसून आले होते. नुकतेच आमदार राम सातपुते यांच्या आमदार फंडातून तालुक्यासाठी ‘एक कोटी’ रुपये मंजूर झाल्याची माहिती आमदार राम सातपुते यांनी बुधवारी पत्रकारांना दिली आहे.
“लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा पुरवणे” या योजनेअंतर्गत माळशिरस तालुक्यासाठी एक कोटी रुपये मंजूर झाले असून लवकरच ही कामे सुरू केली जाणार असल्याची माहिती आमदार राम सातपुते यांनी दिली आहे.
“लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा पुरवणे” या योजनेअंतर्गत मंजूर झालेली कामे;
माळिनगर रस्ता,दसुर रस्ता,कनेर रस्ता,जामशेदवाडी रस्ता, जामशेतवाडीमधील संजय दाबडे वस्तीवर पाण्याची टाकी. त्याचबरोबर पुरंदावडे येथे महालक्ष्मी मंदिर परिसरात संरक्षण भिंत बांधणे,गोरडवाडी येथील म्हसवड रोड ते भीमराव माने व कोकरे वस्ती रस्त्याचे खडीकरण करणे,उंबरे नेरद येथील ‘भगवान नारणवर वस्ती’ रस्ता खडीकरण,खूडूस येथील संत सावतामाळी मंदिर परिसरात रस्ता खडीकरण,हांडेवस्ती आठफटा ते भवानीमाता मंदिर खडीकरण.
कनेरगावातील जाधववाडी येथील धर्मराज माने -पाटील वस्ती रस्ता खडीकरण, नातेपुते येथील डॉक्टर चौधरी घर आनंदनगर वसाहत ते रुपनवर भाऊसाहेब घरापर्यंत रस्ता खडीकरण करणे, फडतरी,निटवेवाडी येथे मारुती मंदिर सभामंडप बांधणे, त्याचबरोबर पिंपरीतील बाळूमामाची वाडी येथे सभामंडप बांधणे,बचेरी येथे तुळजाभवानी मंदिर सभामंडप,पुरंदावडे येथील पालवेवस्ती चिंचणी माय्याका मंदिरासमोर सभामंडप बांधणे, इत्यादी कामे मंजूर करण्यात आल्याचे आमदार राम सातपुते यांनी काल पत्रकारांना सांगितले.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.