विराट कोहलीचा विजयरथ महेंद्रसिंग धोनी रोखणार का? वाचा सविस्तर!

आयपीएल सीजन१४, आता रंगतदार अवस्थेत येऊन पोहोचली आहे. या स्पर्धेतला एकोणीसावा सामना आज दुपारी मुंबईच्या वानखेडे मैदानावर चेन्नई सुपर किंग आणि रॉयल चॅलेंजर बेंगलोर यांच्यामध्ये खेळवण्यात येणार आहे. महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली आमने-सामने असल्यामुळे या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचल्याचे दिसून येत आहे.

 

 

कधीकाळी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली विराट कोहलीने आपल्या करिअरला सुरुवात केली होती. खराब कामगिरी झाल्यानंतरही महेंद्रसिंग धोनीने अनेक वेळा मला ‘बॅक’ केल्याचं विराट कोहलीने अनेदा जाहीरपणे सांगितल्याचं आपणा सर्वांनाच माहिती आहे. महेंद्रसिंग धोनीच्या तालमीत तयार झालेला ‘विराट कोहली’ आज त्याच्याशीच दोन हात करण्यासाठी सज्ज झाला असून,या सामन्यात कोण बाजी मारणार? हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे.

 

https://www.instagram.com/tv/CODQYfXMQZS/?igshid=slgx1hn8yzna

 

आयपीएल ‘हिस्ट्रीचा’ विचार केला तर चेन्नई सुपर किंग रॉयल चॅलेंजर बेंगलोरवर,नेहमीच भारी राहीली आहे. या दोघांमध्ये आतापर्यंत एकूण २७ सामने खेळले गेले असून,यामध्ये चेन्नईने तब्बल सतरा वेळा बेंगलोरला धुळ चारली आहे. तर बेंगलोरला केवळ नऊ सामन्यात विजय मिळवता आला आहे.

जुन्या रेकॉर्डचा विचार केला तर, चेन्नई अधिक बलवान वाटत असली तरी,आत्ताची चेन्नई आणि पूर्वीची चेन्नई यामध्ये खूप फरक आहे. त्याचबरोबर पूर्वीची आरसीबी आणि आताची आरसीबी यातही खूप फरक आहे. या मोसमात आरसीबी संघ कमालीचा बलवान वाटत असून त्यांचे अनेक खेळाडू उत्तम परफॉर्मन्स देखील करत आहेत.

दुसरीकडे पहिल्या पराभवानंतर ‘चेन्नई सुपर किंगची’ गाडी देखील रुळावर आल्याचे पाहायला मिळाले आहे. धोनीची ‘कॅप्टनसी’ ही या संघासाठी नेहमी जमेची बाजू असल्याचं बोललं जातं. डूप्लेसी,गायकवाड,मोईन अली, सॅम करन,दीपक चहर हे खेळाडू सध्या चांगलेच लईत असून पुन्हा एकदा ‘चेन्नईची मदार’ या खेळाडूंवरच असेल. गुणतालिकेत चेन्नईचा संघ चार सामन्यात तीन विजय आणि एका पराभवासह दुसर्‍या क्रमांकावर आहे.

दुसरीकडे विराट कोहलीचा संघ चेन्नई सुपर किंग संघापेक्षा अधिक बलवान वाटतोय. फलंदाजी आणि गोलंदाजीत हा संघ ‘चेन्नई’ सांघापेक्षा अधिक मजबूत असून यांच्याकडे अनेक फायर पावर आहेत. चेन्नई संघाकडे फायर पावरची थोडीशी कमतरता जाणवते. मात्र चेन्नईकडे ‘कॅप्टन कूल’ असल्याने क्रिकेटच्या डावपेचात ते तरबेज आहेत.

मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळविण्यात येणाऱ्या या सामन्यात प्रेक्षकांना मोठी धावसंख्या पाहायला मिळू शकते. सुरवातीच्या दोन-तीन षटकानंतर वानखेडेची खेळपट्टी फलंदाजांना कमालीची साथ देते. आणि याचाच फायदा विराट कोहलीच्या संघाला होण्याची दाट शक्यता आहे. कारण त्यांच्याकडे अनेक फायर पावर उपलब्ध असून ते जबरदस्त फॉर्ममध्ये देखील आहेत.

विराट कोहलीचा संघ चार सामन्यात चार विजयासह गुणतालिकेत अव्वल स्थानावर असून विराट कोहलीचा विजयरथ महेंद्रसिंग धोनी रोखणार का? हे पाहणं खूप औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

https://www.instagram.com/tv/CODNTSdlIa5/?igshid=1em3o18slp3ua

 

गुणतालिकेत अनुक्रमे पहिल्या आणि दुसर्‍या क्रमांकावर असणाऱ्या या दोन्ही संघात आज प्रेक्षकांना ‘कांटे की टक्कर’ पाहायला मिळणार असून यामध्ये विराट कोहलीचा संघ बाजी मारण्याची दाट शक्यता आहे.

 यातून निवडणार दोन्हीं संघ 

चेन्नई सुपर किंग– रुतुराज गायकवाड, फाफ डू प्लेसिस, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायुडू, एमएस धोनी, सॅम कुर्रान, रवींद्र जडेजा, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, लुंगी एनगीडी

बेंगलोर- देवदत्त पदीक्कल, विराट कोहली, शाहबाज अहमद, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, वॉशिंग्टन सुंदर, काईल जेमीसन, डॅनियल सॅम / केन रिचर्डसन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.