बापरे चक्क फटफटीवरून वाळूचोरी 

0

पोलीस व महसूल प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संचारबंदीच्या काळामध्ये  पहाटे चार वाजेपासून गोदावरी नदीच्या पात्रामध्ये  अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू चोरांनी धुमाकूळ घातला आहे आणि  धक्कादायक बाब म्हणजे पैठण शहरातील नाथ मंदिरापाठीमागे असलेल्या नाथ घाट परिसरामध्ये फटफटी गँगने कहरच केलेला पाहायला मिळत आहे.  हे  वाळू तस्कर पहाटे चार वाजेपासून दोन चाकी घेऊन  गोदावरी नदीच्या पात्रात वळूचोरी साठी येत आहेत.

या परिसरामध्ये   वाळू तस्करांनी जीव घेणे खड्डे केले आहेत. गोदावरी नदीच्या पात्रामध्ये गोदा स्नान करण्यासाठी येणाऱ्या  भाविक भक्तांना तसेच दशक्रिया साठी येणाऱ्यांना गोदास्नान करताना आपले जीव धोक्यात घालून पाण्यात उतरावे लागत आहे.  सध्या नदी पात्रामध्ये  कमी पाणी असल्याने जीवित हानी होत नाही. परंतु गोदावरी नदी पात्रात ज्यावेळी   पूर्ण क्षमतेने पाणी सोडल्यावर व पात्र पूर्ण क्षमतेने भr ल तेव्हा  या ठिकाणी झालेल्या खड्ड्यांचा अंदाज बाहेरून  आलेल्या भाविकांना, नागरिकांना येणार नाही  व खड्ड्यात पडून त्यांना आपले जीव गमावावे लागण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे.

गोदावरी नदीच्या पात्रातून वाळू भरून ही फटफटी गँग गल्लीबोळातून भरधाव वेगाने वाहन चालवतांना दिसत आहे. एवढेच  नव्हे तर भरधाव वेगाने भर रोड वर धावतांना दिसत आहेत. या वाळू तस्करांवर  संबंधीत परिसराचे पोलीस अधिकारी, बीट जमादार हे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचे पाहायला मिळत  आहे.

सदर घटनेबाबत पोलीस प्रशासनाचे, महसूलचे वरिष्ठ अधिकारी यांना सोशल मिडियाच्या माध्यमातून स्थानिक  नागरिक व्हिडिओ, फोटो पाठवत असतात  मात्र ते दखल घेतांना दिसत नाहीत. यामुळे नागरिक व भाविक  या अधिकाऱ्यांबद्दल संताप  व्यक्त करत आहेत.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.