सोमंथळी गावच्या राजकारणातील बापमाणूस अनंतात विलिन.

  1.  दि.१९ एप्रिल रोजी  भगवानराव सोडमिसे पाटील यांचा मृत्यू कोरोनाची बाधा झाल्यामुळे झाला. त्यांच्यावर फलटण येथील लाईफ लाईन या हॉस्पिटलमध्ये उपचार चालू होते. त्यांच्या अचानक जाण्यामुळे सोमंथळी गावातील राजकारणात मोठी पोकळी पडल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या जाण्यामुळे सोमंथळी गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

त्यांच्या पश्चात  पत्नी, पाच मुले व एक मुलगी , नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचे मोठे पुत्र श्री. शिवाजी सोडमीसे पाटील हे सोमंथळी गावचे पोलीस पाटील आहेत तर दुसरे संजय सोडमीसे पाटील हे फलटण पंचायत समितीचे सदस्य आहेत.

भगवानराव पाटील हे सोमंथळी गावच्या राजकारणातील सूत्रधार म्हणून ओळखले जात होते. गेले अनेक दशके ते सोमंथळी गावच्या राजकारणात सक्रिय होते. माजी सरपंच, दूध संघाचे माजी संचालक,  ते सोमंथळी येथील श्री. मारुती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष देखील होते.

भगवानराव पाटील यांनी अगदी शून्यातून  आपले विश्व निर्माण केले होते.   सोमंथळी गावचे व फलटण  तालुका पातळीवरील राजकारण म्हटलं की भगवानराव सोडमिसे पाटील हे नाव पुढे येतच असायचे. त्यांच्या शब्दाला प्रमाण मानले जात असायचे.   सर्वसामान्य लोकांना सोबत घेऊन गावगाडा कसा हकायचा हे त्यांना चांगलेच माहिती होते.

एखादा विरोधी गटातील व्यक्तीला जरी त्यांची गरज लागली तरी लेगच मदत करायला हे व्यक्तिमत्त्व तयार असायचे. कधी आपला विरोधी गटातील असा भेदभाव त्यांच्या व्यक्तिमत्त्वात नव्हता. त्यामुळे विरोधी गटातील लोकांची देखील निष्ठा त्यांच्यावर असायची.

फलटण तालुक्यातील बातम्या मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून व्हॉटसअप ग्रुप जॉईन करा.????

https://chat.whatsapp.com/IvMQvZ1V6rsCh5pcI94LUV

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.