‘माही’समोर’के एल राहुलचं’तगडं आव्हान; वाचा सविस्तर!

महेंद्रसिंग धोनीच्या खेळाकडे चाहत्यांचे लक्ष!

9 एप्रिलला सुरू झालेल्या आयपीएल सीजन14 मधील 8वा सामना आज मुंबईच्या वानखेडेच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग आणि पंजाब किंग्स यांच्यामध्ये खेळवण्यात येणार आहे.

7:30 वाजता खेळवण्यात येणाऱ्या या सामन्याकडे दोन्हीं संघातल्या चाहत्यांचे लक्ष असून फलंदाजीसाठी अनुकूल असणाऱ्या या खेळपट्टीवर प्रेक्षकांना मोठी धावसंख्याही पाहायला मिळू शकते. सुरुवातीचे दोन-तीन षटके खेळपट्टी जलदगती गोलंदाजांना चेंडू स्विंग करण्याकरिता मदत करते. त्यानंतर मात्र ही खेळपट्टी फलंदाजांना मदत करत असल्याचे सातत्याने पाहायला मिळाले आहे. सुरुवातीच्या दोन-तीन षटकानंतर या खेळपट्टीवर चेंडू सरळ बॅटवर येतो,त्यामुळे प्रेक्षकांना या मैदानावर आज एक हाय स्कोरींग सामना पाहिला मिळू शकतो.

वानखेडे मैदान हे नेहमी फलंदाजीसाठी अनुकूल राहिलं असतं तरी, क्यूरेटर नेमकी खेळपट्टी कशी तयार करतात? हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. कारण रात्री झालेल्या दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल यांच्या मधला सामना ज्या खेळपट्टीवर खेळवण्यात आला होता,ती खेळपट्टी जलदगती गोलंदाजांसाठी अनुकूल राहिली होती. त्याचबरोबर धावांचा पाठलाग करून या मैदानावर जिंकणं नेहमीच सोपं राहिलं आहे. आणि म्हणून टॉस जिंकणारा संघ प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाला ‘दव’ ट्रॅक्टरमुळे देखील मदत होते.

कोणाचं पारडं जड?         

चेन्नई सुपर किंग या संघाकडे आयपीएलच्या इतिहासातला सगळ्यात सक्सेसफुल संघ म्हणून पाहिले जात असलं तरी सध्या त्यांचे अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट पासून लांब आहेत. फक्त आंतरराष्ट्रीयच नाही तर ते कसल्याही प्रकारचं क्रिकेट खेळत नसल्याने इतर संघाच्या तुलनेत हा संघ थोडासा कमकुवत वाटतो. त्यांचे अनेक खेळाडू आयपीएल सोडून इतर कोणत्याही प्रकारचं क्रिकेट खेळत नसले तरी,अनुभवांनी ते परिपूर्ण आहेत ही देखील एक जमेची बाजू आहे असं म्हणावं लागेल.

महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याच्या चाहत्यांना तो मैदानात चौकार षटकार मारताना पुन्हा पाहायचे आहे. दुबईमध्ये झालेल्या आयपीएल पासून त्याची बॅट थंडावली असून तो मैदानावर कसा खेळ करतोय हे पाहणं चाहत्यांसाठी खूप औत्सुक्याचे ठरणार आहे.

मोईन अली,सुरेश रैना,सॅम करन या फलंदाजांनी राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध आपली झलक दाखवली असली तरी,इतर खेळाडूंच्या फार्म विषयी चिंता व्यक्त केली जातेय. फक्त फलंदाजीच नाही तर गोलंदाजीमध्ये देखील हीच परिस्थिती आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या सलामविरांचा दृष्टिकोन देखील गेल्या काही वर्षापासून चिंतेचा विषय राहिलेला आहे. चेन्नई सुपर किंइच्या सलामीवीरांनी 2018 पासून वानखेडेच्या मैदानावर पावर प्लेमध्ये ५.९ इतक्या कमी इकॉनॉमीने धावा केल्या आहेत. जो की, इतर संघांच्या तुलनेत हा सर्वात कमी आहे. तर दुसरीकडे पंजाब किंग संघाने या मैदानावर सर्वात जास्त ८.५० च्या इकॉनॉमीने धावा काढल्या आहेत.

पंजाब किंग संघाचा विचार केला तर,त्यांचे अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय तसेच घरेलू क्रिकेट खेळताना दिसून येतायत, त्याचबरोबर ते भन्नाट लईत देखील आहेत. मयंक आगरवाल, क्रिस गेल,के एल राहुल,पूरन दीपक हूडा, अशी मजबूत फलंदाजी या संघाकडे आहे. गोलंदाजीमध्ये देखील या संघाकडे धार असल्याचे दिसून येते. मोहम्मद शमी,अर्शदीप सिंह, रवी बिश्नोई असे तगडे गोलंदाज देखील किंग पंजाब संघाकडे आहेत. ओव्हरवॉल विचार केला तर चेन्नई सुपर किंग संघापेक्षा पंजाब किंग हा संघ अधिक बलवान आणि तगडा वाटतोय.

पंजाब किंग संघाने आपला पहिला सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध शेवटच्या षटकांमध्ये जिंकून या स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे,तर दुसरीकडे चेन्नई सुपर किंगला आपल्या पहिला सामन्यात दिल्लीकडून लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला आहे. धोनीची कॅप्टनसी विरूद्ध पंजाब किंग्स संघाची फलंदाजी,गोलंदाजी असा हा सामना रंगणार असून ओव्हरवॉल विचार केला तर,हा सामना पंजाब किंग्स चेन्नई सुपर किंगचा सहज पराभव करेल असं दिसतंय.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.