गुरु विरुद्ध शिष्य; कोण मारणार बाजी?

इंडियन प्रीमियर लीगच्या 14व्या सीझनची सुरुवात काल चेन्नईच्या चेपॉक मैदानावर झाली. गतविजेता मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यामध्ये खेळल्या गेलेल्या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात बेंगलोरने मुंबई इंडियन्सवर दोन विकेट्सने विजय मिळवला.

चेन्नईच्या चपॉक मैदानावर खेळला गेलेला मुंबई आणि बेंगलोर यांच्यामधला सामना प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा होता. एबी डिव्हिलियर्सच्या झंझावात खेळीमुळे बेंगलोर संघाला या सामन्यात कसाबसा विजय मिळवता आला. मुंबईच्या वानखेडे मैदानावर या स्पर्धेचा दुसरा सामना आज चेन्नई सुपर किंग आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये होणार आहे. या सामन्याविषयीची क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचल्याचे देखील दिसून येत आहे.

मुंबई इंडियन्स नंतर सर्वात सक्सेसफुल टिम म्हणून चेन्नई सुपर किंग्सकडे पाहिलं जातं. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने तीन वेळा विजेतेपद मिळवले आहे. चेन्नई आणि धोनीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असून त्यांच्याकडून त्यांच्या चाहत्यांची खूप मोठी अपेक्षा असणार आहे.

गेल्या वर्षी दुबईमध्ये झालेल्या स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स सातव्या क्रमांकावर राहीली होती. गेल्या वर्षी चेन्नई सुपर किंगवर आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच साखळीत गारद होण्याची नामुष्की ओढवली होती. या स्पर्धेत चेन्नईचा संघ नव्या जोमाने उतरणार असला तरी या वेळेस देखील त्यांनी आपल्या संघात फारसे बदल केले नाहीत.

चेन्नईचा संघ अनुभवांनी परिपूर्ण असला तरी,त्यांच्या संघातील अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय तसेच,कोणत्याही प्रकारचे घरेलू क्रिकेट खेळत नसल्यामुळे त्यांच्यासमोर ही खूप मोठी आव्हानं असणार आहेत. याउलट दिल्लीच्या संघात अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळून आलेले खेळाडू असून ते चांगल्या फॉर्ममध्ये देखील आहेत.

चेन्नई आणि दिल्ली यांच्यामध्ये आतापर्यंत एकूण 23 सामने झालेले असून यामध्ये चेन्नईचा बोलबाला राहिला आहे. चेन्नईने 15 तर दिल्लीने केवळ आठ सामने जिंकले आहेत. आकडे भलेही चेन्नईची ताकद दाखवत असले तरी, त्याळेसची चेन्नई आणि आत्ताची चेन्नई यात खूप मोठा फरक आहे.

क्षेत्ररक्षण,फलंदाजी आणि गोलंदाजी या तिन्ही प्रकारात चेन्नईचा संघ सुमार वाटतोय. चेन्नईचे दोन सलामीवीर कोण असतील? हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. त्याचबरोबर फिनिशियरची भूमिका कोण निभावणार? हा प्रश्न देखील गुलदस्त्यातच आहे. अशीच काहीशी परिस्थिती चेन्नईच्या गोलंदाजी बाबतही आहे. गोलंदाजीची मदार कोणावर असणार? हे देखील अस्पष्टच आहे.

https://www.instagram.com/p/CNetdEBALVi/?igshid=1dpkw1ull5iwp

दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजी, गोलंदाजी विषयी बोलायचं झालं तर हा संग काहीसा समतोल वाटतोय. ‘शिखर धवन’ आणि पृथ्वी शॉ डावाची सुरुवात करतील. अजिंक्य राहणे किंवा स्टीव स्मिथ नंबर तीनवर फलंदाजी करतील. नंबर चार ऋषभ पंत तर फिनिशियर म्हणून मार्कस स्टॉईनिस आणि हेटमायर काम पाहतील.

https://www.instagram.com/p/CNe-ozUBrV0/?igshid=15ce3jt1g7ifh

‘दिल्ली कॅपिटल्स’ संघ ‘चेन्नई सुपर किंग’ संघापेक्षा तुल्यबळ वाटत असला तरी,सामना जिंकण्यासाठी त्यांना आपला खेळ दाखवावा लागणार आहे. दिल्ली कॅपिटल संघाकडे खूप मोठे पावर हिटर असले तरी,ते दबावात कशी कामगिरी करतात? यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असणार आहेत.

नॉर्खिया आणि रबाडा यांच्या अनुपस्थित दिल्लीच्या गोलंदाजीची मदार कोणावर असेल? हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. श्रेयश अय्यरच्या दुखापतीमुळे कॅप्टन पदी वर्णी लागलेल्या ऋषभ पंतकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. त्याचबरोबर ‘कॅप्टन’ म्हणून तो कशी कामगिरी करतो,हे पाहूणं देखील औत्सुक्याचे ठरणार आहे.‌

यातून निवडणार दोन्हीं संघ;

दिल्ली कॅपिटल्स; पृथ्वी शॉ, शिखर धवन,अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, मार्कस स्टोइनिस, शिमरॉन हेटमीयर / सॅम बिलिंग्ज, ख्रिस वॉक्स / टॉम कुरन, रविचंद्रन अश्विन, प्रवीण दुबे / अमित मिश्रा, इशांत शर्मा, उमेश यादव

चेन्नई सुपर किंग;रुतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा / अंबाती रायडू, फाफ डु प्लेसिस, सुरेश रैना, एमएस धोनी, मोईन अली, सॅम कुररण, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, इम्रान ताहिर

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.