अनुपमाने नाही,’हिने’काढली बुमराहची विकेट! वाचा सविस्तर!

भारताने इंग्लंडचा कसोटी मालिकेत ३-१असा धुव्वा उडवल्यानंतर क्रिकेट चाहत्यांना टी-20 मालिकेतची प्रतीक्षा लागली. भारताचा जलदगती गोलंदाज, t-20 स्पेशालिस्ट बुमराने t20 आणि वन डे मालिकेत वैयक्तिक कारण देत माघार घेतली. मात्र नंतर त्याने आपल्या लग्नासाठी सुट्टी काढली असल्याचे समोर आल्यानंतर, टी-ट्वेंटी मालिकेपेक्षाही जास्त, बुमराचे लग्न कोणासोबत होणार? याची उत्सुकता चाहत्यांना लागली. चाहत्यांनी अनेक तर्कवितर्क लावले. बुमराचे लग्न कोणासोबत? याची चर्चा सोशल मीडियावर देखील तुफान व्हायरल झाली.

भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराने बीसीसीआयला वैयक्तिक कारण देत इंग्लंड विरुद्धच्या t20 आणि वनडे मालिकेतून माघार घेतली. जसप्रीत बुमराहने या मालिकेतून माघार का घेतली? याचे अनेक तर्क वितर्क लावले जात असतानाच,बीसीसीआयच्या सूत्रांकडून बुमराने लग्नासाठी सुट्टी मागितली असल्याचे समोर आले. बुमराने लग्नासाठी सुट्टी मागितली असल्याचे समोर आल्यानंतर सोशल मीडियावर जसप्रीत बुमराहचे लग्न साऊथ एक्टरेस अनुपमा परमेश्वरन हिच्याशी होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या.

जसप्रीत बुमरा साऊथ एक्टरेस अनुपमाला ‘डेट’ करत असल्याच्या बातम्या अनेक वेळा समोर आल्या. मात्र या दोघांनी याविषयी कुठेही स्पष्टीकरण दिले नाही. आणि आत्ता जसप्रीत बुमराहने लग्नासाठी सुट्टी काढल्याचे समोर आल्यानंतर बुमराहचं लग्न अनुपमाशी होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली. मात्र अनुपमा व्यतिरिक्त आणखी एक नाव चर्चेत आलं असून सोशल मीडियावर ‘या’ नावाची देखील चर्चा रंगू लागली आहे.

जसप्रित बुमराह संजना गणेशन हिच्याशी लग्न करणार असल्याचा मीडिया रिपोर्टनुसार समोर आलं असून, हे दोघे गोव्यात लग्न करणार असल्याची माहिती आहे. आता तुम्हाला संजना गणेशन कोण आहे असा प्रश्न पडला असेल? तर संजना गणेशन ही स्पोर्ट अँकर असून तिने मॉडेलिंग देखील केलं आहे.

एवढेच नाही तर तिने अनेक, इव्हेंट होस्ट देखील केले आहेत. इंग्लंडमध्ये झालेल्या 2019 च्या विश्वचषकामध्ये भारताकडून तिने होस्ट अॅकर म्हणून काम पाहिलं आहे. त्याचबरोबर बीसीसीआयच्या एका कार्यक्रमात संजना गणेशन हिने बुमराहचा इंटरव्यू देखील घेतला होता.

ट्विटरवर बुमराच्या रिलेटेड असणाऱ्या अनेक ट्विटला तीने रिप्लाय दिले असल्याने,देखील ही चर्चा अधिक जोर धरू लागली असल्याचे बोलले जातंय. जसप्रित बुमराह आणि संजना गणेशन हे दोघे एकमेकांशी लग्न करणार असल्याचे अद्याप कोणीही अधिकृतपणे सांगितलेलं नाही. जसप्रीत बुमराह कोणाशी लग्न करणार? हा प्रश्न काही दिवस तरी चर्चेत राहणार आहे, एवढं मात्र नक्की!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.