टी-ट्वेंटी मालिकेसाठी भारतीय संघ सज्ज; सराव करतानाचा व्हिडिओ व्हायरल

४ मार्चला नरेंद्र मोदी क्रिकेट मैदानावर चौथा कसोटी सामना भारताने एक डाव आणि २५ धावाने जिंकत चार कसोटी सामन्यांची मालिका ३-१ जिंकत इंग्लंडचा धुव्वा उडवला. या मालिका विजयाबरोबच भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचं तिकीट देखील मिळवलं आहे. कसोटी मालिकेच्या विजयानंतर क्रिकेट चाहत्यांचे आता टी-ट्वेंटी मालिकेकडे लक्ष लागून राहिले आहे. भारतीय संघाने टी-ट्वेंटी मालिकेची तयारी करताना, नेटमध्ये कसून सराव करण्यास सुरुवात केली आहे.

कसोटी मालिका विजयानंतर टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ आता सज्ज झाला असून नेटमध्ये विराटचा संघ कसून सराव करताना दिसत आहे. यासंबंधीचा व्हिडीओ ‘इंडियन क्रिकेट टीम’ नावाच्या अधिकृत सोशल अकाउंट वरून शेअरही करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये अनेक नवीन खेळाडू कसून सराव करताना दिसून येत आहेत.

आयपीएलमध्ये तसेच घरेलू क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अनेक खेळाडूंना भारतीय संघात संधी मिळाली आहे. त्याचबरोबर अनेक इंजुरी झालेल्या खेळाडूंचं देखील या मालिकेत पुनरागमन होताना चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. नवीन आणि पुनरागमन होणाऱ्या सर्वच खेळाडूंनी टी-ट्वेंटी मालिकेच्या तयारीसाठी नेटमध्ये कसून सराव करण्यास सुरुवात केली आहे.

https://www.instagram.com/p/CMMHIxogan2/?igshid=18bu11ndwr183

सूर्यकुमार यादव,ईशान किशन सह अनेक नवीन खेळाडूंनी टी-20 मालिकेसाठी आपण तयार असल्याचे संकेत देत कसून सराव केला आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्या विरुद्ध झालेल्या मालिकेत कमालीचा फॉर्म दाखवणाऱ्या ऋषभ पंतचं देखील टी-20 मालिकेत पुनरागमन झालं आहे.

https://www.instagram.com/p/CMMWJlWgqgp/?igshid=k63usdce06cc

12 मार्च पासून सुरु होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी विराट कोहली सज्ज झाला असला तरी, अंतिम 11 खेळाडू निवडीचा मोठा पेच विराट समोर निर्माण झाला असून अंतिम 11 मध्ये कोण कोणते खेळाडू असणार आहेत, हे पाहणं खूपच उत्सुकतेचे ठरणार आहे. मात्र पाच सामन्यांची मालिका असल्यामुळे प्रत्येक खेळाडूला संधी मिळणार असल्याचे देखील दिसून येत आहे.

या मालिकेत अनेक नवीन खेळाडूला संधी देण्यात आलेली असून या मालिकेत हे खेळाडू आपलं नशीब आजमावताना दिसून येतील. त्याचबरोबर भारतीय संघाला अनेक स्टार खेळाडू देखील मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.