गजा मारणे टोळीनंतर नीलेश घायवळ टोळी पोलिसांच्या निशाण्यावर

नवी मुंबईच्या तळोजा जेलमधून सुटल्यानंतर गजा मारणे याने मुंबई पुणे एक्स्सप्रेसवे वरती शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन  मोठं शक्तीप्रदर्शन केलं. यानंतर सर्वसामान्यांनी प्रश्न उपस्थित केल्याने  पुणे पोलिसांनी गजा मरणेवर  गुन्हाही  दाखल केला आहे.  गजानन मारणे टोळीनंतर नीलेश घायवळ टोळी पोलिसांच्या रडारवर आली आहे.

चॉपरचा धाक दाखवून रॅलीसाठी जबरदस्तीने जीप घेऊन जाणाऱ्या घायवळ टोळीमधील  8 जणांवर गुन्हे शाखेच्या पथकाकडून खंडणीविरोधी दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर दोघांना अटक देखील करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्यांची नावे संतोष आनंद धुमाळ (वय 38, रा. भूगाव, ता. मुळशी) आणि मुसाब ऊर्फ मुसा इलाही शेख (वय 29, रा. शास्त्रीनगर, कोथरूड) अशी  आहेत. एका गॅरेज व्यावसायिकाने याबाबत माहिती दिली होती.

तक्रारदार व्यक्ती गॅरेजमध्ये काम करत होती. त्यावेळी निलेश घायवळ टोळीतील संतोष धुमाळ याच्या  सांगण्यावरुन कुणाल कंधारे, मुसाबा शेख, अक्षय गोगावले, व इतर चार अशा आठ जणांनी मिळून चॉपरचा धाक दाखवला व  त्यांची जीप चोरुन नेली.

अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे, पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस उपनिरीक्षक विजय झंझाड यांच्या पथकाकडून  ही कारवाई करण्यात आली आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.