पेट्रोलच्या वाढत्या किमतीवर व्हिडिओ बनवला म्हणून पोलिसात तक्रार;श्याम रंगीलाने जिंकली मने

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांची मिमिक्री करून कॉमेडियन ‘श्याम रंगीला’ याने कमालीची लोकप्रियता मिळवली आहे. मोदींची मिमिक्री करून आपल्या यूट्यूब चैनल वरून घराघरात पोहोचणाऱ्या श्याम रंगीलाने नुकत्याच शूट केलेल्या एका व्हिडिओमुळे त्याच्यावर आता तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.

राजस्थानच्या श्रीगंगापूरनगर मधील हनुमानगढ रोड वरील एका खाजगी पेट्रोल पंपावर, श्याम रंगीला याने पेट्रोलच्या वाढलेल्या किमतीवर एक व्हिडिओ बनवला. हा व्हीडीओ अतिशय गमतीशीर असून सोशल मीडियावर तुफान वायरलही झाला.

मेरे प्यारे देशवासियों,राजस्थान कें श्रीगंगापूरनगर की जनता का गर्व से सीना चौड़ा हो गया है। यहां पर पेट्रोल की कीमत शंभर रुपए को छू गई है। भाइयों और बहनों आजाद भारत के इतिहास में आज तक ऐसी कोई सरकार नहीं आई थी,जो पेट्रोल को उसकी असली कींमत दिलवा पाए। पेट्रोल को उसका हक हमने दिलवाया है… अशा शब्दात कॉमेडियन श्याम रंगीला याने मोदींच्या स्टाईलमध्ये व्हिडिओ बनवला आणि आपल्या यूट्यूब चैनल वर पोस्ट केला. एकीकडे हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरलही झाला. मात्र दुसरीकडे श्याम रंगीलाच्या अडचणी वाढल्या.

हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाल्यानंतर,पेट्रोल पंप संचालकाने जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये श्याम रंगीला याच्या विरोधात तक्रार दाखल केली असून,गुन्हा दाखल करण्याची मागणीदेखील केल्याची माहिती आहे. ‘प्रायव्हेट तेल’ कंपनीच्या दबावाखाली येऊन पेट्रोल पंप संचालक ‘सुरेंद्र अग्रवाल’ यांनी ही कारवाई केल्याचे समजते.

जर गुन्हा दाखल झाला नाही तर,पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा देखील बंद करण्यात येईल,असं तेल कंपनीकडून सांगण्यात आल्याने सुरेंद्र अग्रवाल यांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्याची माहिती आहे. सुरेंद्र अग्रवाल यांचं म्हणणं आहे,मला श्याम रंगीला याचा ‘पत्रकार’ आहे म्हणून फोन आला. आणि मला फक्त फोटो घ्यायचेत असं सांगितलं. मात्र श्याम रंगीला याने माझ्या व्हिडिओची मी पूर्ण कल्पना देऊन त्यांनी होकार दिल्यानंतरच व्हिडिओ शूट केला असल्याचा दावा केला आहे.

श्याम रंगीला पुढे म्हणाला,जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागायला तयार आहे. माझ्यामुळे जर पेट्रोल पंप संचालक अडचणीत येत तर मी माफी मागायला तयार आहे. मात्र मी जो व्हिडिओ बनवला आहे,त्यामध्ये काहीही चूक नसून,मी तो व्हिडिओ डिलीटही करणार नाही. त्याच बरोबर या व्हिडिओ संदर्भात मी माफी मागण्याचा ही प्रश्नही येत नाही.

श्याम रंगीला याने आणखी एक व्हिडिओ शेअर करत अनेकांची मने जिंकली आहेत. आपल्या यूट्यूब चैनलवर एक व्हिडिओ शेअर करत शाम रंगीला म्हणतोय,माझ्या व्हिडिओमुळे जर तेल कंपनीची प्रतिमा खराब होत असेल तर, उद्या मी एखाद्या कंपनीचा टि-शर्ट घातला तरी त्यांची देखील प्रतिमा खराब होईल,मी घातलेल्या शूजच्या कंपनीचीही प्रतिमा खराब होईल,मी वापरत असणार्‍या सायकलच्या कंपनीची देखील प्रतिमा खराब होईल.

एक कलाकार म्हणून श्याम रंगीला याने घेतलेल्या या निर्णयाचे सोशल मीडियावर अनेकांकडून कौतुक करण्यात येत आहे. त्याचबरोबर श्याम रंगीला याला मोठ्या प्रमाणात सपोर्ट देखील मिळाल्याचे दिसून येत आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.