भारतीय टी-20 संघात अनेक नवीन खेळाडूंना संधी!

भारत आणि इंग्लंड यांचामध्ये होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून यामध्ये अनेक नवोदित खेळाडूंना संधी तर,काही जुन्या खेळाडूंना डच्चू देखील देण्यात आलेला आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये सध्या कसोटी मालिका खेळवण्यात येत असून,या मालिकेतील तिसरा कसोटी सामना अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. 50% प्रेक्षकांच्या उपस्थितीत हा सामना खेळवण्यात येणार असून भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी हा सामना जिंकणे किंवा ‘ड्रॉ’ राखणे अनिवार्य आहे.

कसोटी मालिकेनंतर भारतीय संघाला 12 मार्चपासून 5 t20 सामन्यांची मालिका खेळायची असून,या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड देखील करण्यात आली आहे.‌ करोणामुळे पाचही टी-20 सामने अहमदाबादच्या सरदार पटेल या एकाच मैदानावर खेळविण्यात येणार आहेत.

पाच t20 सामन्यांच्या मालिकेसाठी एकूण 19 खेळाडूंची निवड करण्यात आलेली असून,यामध्ये अनेक नवीन खेळाडूंना संधी देण्यात आलेली आहे,तर काही अनुभवी खेळाडूंना डच्चू देखील देण्यात आलेला आहे.

ऑस्ट्रेलिया आणि आत्ता सुरू असलेल्या मालिकेत कमालीचा फार्म दाखणारा ऋषभ पंतचे t20 संघात पुनरागमन झाले असून दुसरा विकेट किपर बॅट्समन म्हणून इशान किशनला संधी देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर गेल्या काही वर्षापासून घरेलू क्रिकेटमध्ये सातत्याने धावा करणाऱ्या सुर्यकुमार यादवला देखील अखेर न्याय मिळाला आहे. त्याचबरोबर आयपीएलमध्ये शेडन कॉट्रेलच्या एकाच षटकात 5 षटकार ठोकून एकाच रात्रीत प्रकाशझोतात आलेल्या राहुल तेवातीयाला देखील भारतीय टी-20 संघात स्थान मिळाले आहे.

क्रिकेट एक्सपर्ट तसेच अनेकांकडून वारंवार प्रशंसा होत असणाऱ्या संजू सॅमसनला मात्र डच्चू देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर मनीष पांडेलाही भारतीय t20 संघात स्थान मिळालेले नाही. मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमरा विश्रांती देण्यात आली असून भुवनेश्वर कुमारचे संघात पुनरागमन झालेले आहे.

असा आहे भारतीय t20 संघ-

विराट कोहली,रोहित शर्मा, शिखर धवन,श्रेयश अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवाटीया, अक्षर पटेल, केएल राहुल,ऋषभ पंत,ईशान किशन, युजवेद्र चहल, भुवनेश्वर कुमार,दीपक चहर, शार्दुल ठाकुर,टी नटराजन,वरुण चक्रवर्ती,नवदीप सैनी.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.