काय असेल’तैमूरच्या’ भावाचं नाव? सोशल मीडियावर चर्चेला उधाण!

मुंबईतील ‘ब्रीच कॅण्डी’ रुग्णालयात करीना कपूर खानने चार वर्षानंतर आपल्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे‌. करीना कपूर आणि सैफ अली खान यांनी २०१२ मध्ये लग्न केल्यानंतर त्यांनी आपल्या पहिल्या मुलाला 20 डिसेंबर 2016 ला जन्म दिला. तैमूरच्या जन्मानंतर अनेक वर्षं तो मीडियामध्ये तसेच सोशल मीडियामध्ये कमालीचा चर्चेत राहिला. आज पुन्हा एकदा तैमूर आणि त्याचा छोटा भाऊ सोशल मीडियावर ट्रेन्ड होताना पाहायला मिळत आहे.

‘टशन’ या चित्रपटात एकत्र काम केल्यानंतर करीना कपूर आणि सैफ अली खान एकमेकांच्या प्रेमात पडले. पुढे या दोघांनी 2012 मध्ये लग्नही केलं. दोघांच्या वयामध्ये दहा वर्षाचं अंतर असूनही दोघांनी लग्न केल्यानंतर अनेकांनी यांच्यावर टीकाही केली. मात्र या दोघांनी आतापर्यंत आपल्या वैवाहिक जीवनाचा गाडा यशस्वीरित्या हाकला असून दोघेही खूप आनंदी असल्याचे वारंवार दिसून येतंय.

तैमूरच्या जन्मानंतर अनेक वर्ष तो मीडिया तसेच सोशल मीडियावर कमालीचा चर्चेत राहिला. त्यानंतर आज पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे. करीना कपूर खाने आपल्या दुसऱ्या मुलाला जन्म दिल्यानंतर तैमूरच्या भावाचं नाव काय असेल? हे जाणून घेण्यासाठी अनेकांमध्ये कमालीची उत्सुकता असल्याचं पाहायला मिळत आहे.

तैमूर अली खानच्या भावाचे नाव काय असेल? याची लोकांमध्ये मोठी उत्सुकता असून,सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात चर्चेला उधाण देखील आल्याचे दिसत आहे. आज ट्विटरवर सातव्या क्रमांकावर ‘औरंगजेब’ या नावाचा हॅशटॅग ट्रेन्ड झाल्याचे झाला असून,काहींनी या हॅशटॅगवर मोठ्या प्रमाणात टीका केली असली तरी,या ‘हॅशटॅगला’ मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देखील मिळाला आहे,हेही तितकेच खरे आहे.

ट्विटरवर औरंगजेब नावाचा हॅशटॅग का ट्रेन्ड झाला?

धर्मवाद्यांकडून काहींना नाही म्हटलं तरी, काही प्रमाणात टार्गेट केलं जातं. हे अलीकडच्या काळात सातत्याने दिसून येताना पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पार्टी सत्तेत आल्यानंतर हे प्रमाण अधिक तीव्र झाल्याचे दिसून येत असून विरोधकांकडून हा आरोप सातत्याने केला जातो. बीजेपी विरोधात एखादा बोलला तर, त्याच्या विरोधात एखादा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेन्ड केला जातो,हे प्रमाण अलीकडच्या काळात अधिक तीव्रतेने झाल्याचे निदर्शनास येत आहे. त्याचाच फटका सैफ अली खान याला बसला असं ठामपणे म्हणता येणार नसलं तरी, ही शक्यता नाकारताही येत नाही.

तैमूर अली खानच्या भावाचे नाव काय असणार? या प्रश्नाचे उत्तर सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या व्यतिरिक्त कोणीही देऊ शकणार नसलं तरी,येणारे काही दिवस हा प्रश्र्न कमालीचा चर्चेत राहणार आहे एवढे मात्र नक्की.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.