इंग्लंडच्या संघात चार बदल; इंग्लंडचा विजयरथ भारत रोखणार का?

नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने कसोटी मालिका जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली होती.  विशेष म्हणजे प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत केलेल्या या कारणाम्यामुळे टीम इंडियाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले. मात्र इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीत 227 धावांनी झालेल्या दारूण पराभवानंतर टीम इंडियाला मोठ्या टीकेला देखील सामोरं जावं लागलं.

चेन्नईच्या चेपॉक मैदानावर दुसरा कसोटी सामना आज साडेनऊ वाजता खेळवण्यात येणार असून, भारतासमोर उर्वरित तीन सामन्यांमध्ये दोन सामने जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश करता येणार आहे. तीन सामन्यांमध्ये भारताने दोन सामने जिंकले तरी ती सरसावणार भारताला करावाच लागणार आहे. अन्यता भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचू शकणार नाही. भारतासमोर हे मोठे आव्हान असले तरी भारत उर्वरित तिन्हीं सामने जिंकू शकतो, असा आत्मविश्वास भारतीय संघाकडे आहे.

ऑस्ट्रेलिया मालिकेतीलही पहिल्या सामन्यात भारताला दारून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर भारतीय संघाने कमालीचे मुसंडी मारत, मालिका विजयाची कमाल केली होती. जोस बटलर,जेम्स अँडरसन,जोफ्रा आर्चर, यांच्या अनुपस्थितीत इंग्लंडचा संघ आज उतरणार असून,भारतीय संघाला मुसंडी मारण्याची ही एक सुवर्णसंधी असणार आहे. या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना प्रवेश मिळणार असल्याने भारतीय संघासाठी एकप्रकारे टॉनिकच मिळणार आहे.

पहिल्या कसोटीत अंतिम अकरा निवडी वरून विराट कोहलीला टीकेचा सामना करावा लागला होता. आज ठेवण्यात येणार्‍या दुसर्‍या कसोटीत अंतिम 11 मध्ये काही चेंजेस होण्याची शक्यता आहे. वॉशिंग्टन सुंदरच्या जागी अक्षर पटेला संधी मिळण्याची शक्यता आहे. भारताला या कसोटी उत्कृष्ट कामगिरी करायची असेल तर प्रमुख फलंदाजांना उत्तम कामगिरी करावी लागणार आहे खास करून रोहित शर्माला. गेल्या काही महिन्यांपासून रोहित शर्माची बॅट थंडावली असून, त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा चाहत्यांना असणार आहे.

पहिल्या कसोटीत इंग्लंडने 227 धावांनी विजय संपादन केला असला तरी, या कसोटीत भारताचेच पारडे जड असणार आहे. टॉसचीही भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्या निर्णय दोन्ही संघांचे कर्णधार करतील.

*दोन्ही संघ यातून निवडतील अंतीम अकरा-*

*भारतीय संघ-* विराट कोहली ( कप्तान), अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद सिराज, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, हार्दिक पंड्या, मयंक अग्रवाल, केएल राहुल, ऋद्धिमान साहा, शार्दुल ठाकुर.

*इंग्लैंड-* (१२ खेळाडू) – जो रूट (कप्तान ), डोमिनिक सिबली, रोरी बर्न्स, ओली पोप, डैन लॉरेंस, बेन स्टोक्स, बेन फोक्स, मोईन अली, क्रिस वोक्स, स्टुअर्ट ब्रॉड, जैक लीच, ओली स्टोन.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.