‘राणे’गट सत्तेत आल्यानंतर विकासाला चालना मिळेल; पिंपरीकर

माळशिरस तालुक्यातील पिंपरी गावाचे राजकारण गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनला आहे. सत्तेसाठी दोन्ही गट आपापल्या परीने कंबर कसताना दिसून येत आहेत.

एकनाथ कर्चे आणि राजेश कर्चे यांच्या गटातील दोन सदस्यांच्या अपात्रतेच्या प्रकरणाचा निकाल वादींच्या बाजूनी लागण्याची दाट शक्यता असल्यामुळे,’राणे’ गट पिंपरी ग्रामपंचायतीवर सत्ता स्थापन करू शकेल असं गावात बोललं जात आहे.

गेल्या पाच दहा वर्षाच्या राजकारणाचा विचार केला तर, गावातली अनेक विकासकामे रखडली असल्याचं नागरिकांकडून सांगण्यात येतंय. मात्र जर ‘राणे’ गट सत्तेत आला तर रखडलेल्या विकास कामांना नक्कीच चालना मिळेल असं गावातील ज्येष्ठ मंडळी सांगताना दिसून येतायत.

राणे गट हा तत्त्वाशी एकनिष्ठ आहे. त्याचबरोबर या गटाला सर्वसामान्यांची जाण आहे. यांची जनतेशी बांधिलकी आहे. त्यामुळे हा गट सत्तेत आला तर आम्ही किमान आशावादी तरी राहू,असं गावातील अनेकांचं म्हणणं असल्याचं दिसून आलं.

वार्ड क्रमांक तीन मधून मारुती राणे त्यांच्या पॅनेलमधून निवडणूक लढवणाऱ्या गणेश गेंड यांच्याकडून आम्हा तरुणांना खूप मोठी अपेक्षा आहे. आम्ही टाकलेल्या विश्वासाला आमचे गेंड सर तडा जाऊ देणार नाहीत,असं गावातील तरुण म्हणताना दिसून आले. त्याचबरोबर बाप्पू कर्चे या तरुणांकडून देखील आम्हाला खूप मोठी आशा आहे,असं गावातील जागरूक मतदार म्हणताना दिसून आला.

बाळासाहेब कर्चे या प्रतिष्ठित व्यक्तीचा पराभव गणेश गेंड यांना करण्यात कशामुळे यश आलं? या प्रश्नाचे उत्तर देताना नागरिक म्हणाले, वार्ड क्रमांक तीन मधील पाठीमागच्या दहा वर्षाच्या राजकारणाचा विचार केला तर प्रस्थापितांविरुद्ध खूप मोठा नाराज गट होता. आणि त्याचाच फटका बाळासाहेब कर्चे यांना बसला. गणेश गेंड यांच्या सोबत तरुण वर्गही मोठ्या प्रमाणात होता, असही स्थानिकांनी सांगितलं.

विकास कामांची तळमळ असणारी मोठी फळी ‘राणे’ गटाकडे असल्याचं स्थानिकांकडून सांगण्यात येत असून,’राणे गट’ सत्तेत येण्यासाठी आमच्या त्यांना शुभेच्छा देखील आहेत,असंही स्थानिकांकडून सांगण्यात आलं. पिंपरी ग्रामपंचायतीवर कोणाची सत्ता येणार? हे पाहणे येणाऱ्या काळात खूप औत्सुक्याचे ठरणार आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.