गेल्या ऐंशी दिवसांपासून गाजीपुर,दिल्ली बॉर्डरवर लाखोंच्या संख्येने शेतकरी केंद्र शासनाने लागू केलेल्या तिन्हीं कृषी कायद्याविरोधात आंदोलन आंदोलन करत आहे. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या या आंदोलना विषयी केंद्र शासन अनुकूल नसल्याचे दिसून आल्यानंतर शेतकरी अधिक आक्रमक झाल्याचे सातत्याने पाहायला मिळत आहे.
शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ इंटरनॅशनलच्या अनेक खेळाडू,कलाकारांनी ट्विट केल्यानंतर हे आंदोलन आणखी तीव्र झाल्याचे दिसून आले. इंटरनॅशनल कलाकारांच्या विरुद्ध भारतीय कलाकार असा सामना रंगल्याचेही पाहायला मिळाले. आंतरराष्ट्रीय गायिका रिहानाच्या ट्विटला उत्तर देताना,अनेक बॉलीवूड कलाकार क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांनी हा आमच्या देशात अंतर्गत विषय असल्याचं म्हटलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत,या आंदोलना विषयी भाष्य करताना देशात आता नवीन जीवी तयार झाली असून, तीचं नाव आंदोलनजिवी आहे. पंतप्रधानांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना देशातल्या अनेकांनी पंतप्रधानांवर सडकून टीका केली आहे. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील पंतप्रधान यांनी केलेल्या भाष्यावर सडकून टीका केली आहे.
राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी आज संसदेत भाषण करताना आपण भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्वप्रथम आंदोलनाचाच पर्याय निवडला होता,तरीसुद्धा या देशात आंदोलन जीवी हा शब्द पंतप्रधान कसा काय वापरू शकतात? असा खडा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. खासदार अमोल कोल्हे म्हणाले, बरं झालं तुम्ही आम्हाला आंदोलनजीवी या शब्दाची निर्मिती करून दिली. कारण महाराष्ट्रात भाजपाचे अनेक नेते ऊठसूट आंदोलन करत फिरत असतात. अशी सडकून टीका देखील अमोल कोल्हे यांनी भाजपच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांवर केली.
जर राजाचा अहंकार प्रजा हितापेक्षा मोठा असेल तर समजून जायचं, राजाचा अंत निश्चित आहे. असा घणाघात ही खासदार अमोल कोल्हे यांनी संसदेत उपस्थित केला. अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीचे शिरूर मतदार संघाचे खासदार आहेत. 2019 च्या लोकसभेत त्यांनी शिवसेनेच्या आढळराव पाटील यांचा पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला होता.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.