पहिल्या कसोटीवर इंग्लंडची पकड;भारत पराभवाच्‍या छायेत!

भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये सुरु असलेल्या पहिला कसोटी सामन्यावर इंग्लंड संघाची मजबूत पकड असून उद्या इंग्लंडकडे विजयाची सुवर्णसंधीही आहे. इंग्लंड संघाचा दुसरा डाव 178 धावांत गुंडाळला असला तरी, त्यांच्याकडे पहिल्या डावातील २४१ धावांची आघाडी असल्यामुळे इंग्लंडने या सामन्यात मजबूत पकड निर्माण केली आहे.

उद्या भारताला शेवटच्या दिवसात विजयासाठी आणखी ३८१ धावांची आवश्यकता आहे. रोहित शर्माच्या रूपात भारताने एक गड गमावला असून, भारतासमोर हा सामना वाचवण्याचे तगडे आव्हान असणार आहे. भारताला विजयासाठी आणखी ३८१ धावांची आवश्यकता असली तरीसुद्धा या सामन्याचे तीनही निकाल लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

इंग्लंडचा दुसरा डाव रविचंद्रन अश्विनीने आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवला. इंग्लंडचा दुसरा डाव १७८ धावांत गुंडाळण्यात भारतीय गोलंदाजांना यश आलं. दुसऱ्या डावात अश्विनीने सतरा षटकात ६१ धावा देत इंग्लंडचे सहा महत्वाचे फलंदाज बाद केले. या ही सामन्यात रूटने सर्वाधिक ४० धावांचे योगदान दिले.

पहिल्या डावातल्या २४१ धावांच्या आघाडीच्या जोरावर इंग्लंडने भारतासमोर विजयासाठी ४२० धावांचे आव्हान ठेवले आहे. आजच्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा,भारताने रोहित शर्माच्या रूपात एक गडी गमावून तेरा षटकात ३९ धावा केल्या आहेत. सलामीवीर शुभमन गिल ३५ चेंडूत १५ तर चेतेश्वर पुजारा 23 चेंडूत 12 धावांवर खेळत आहेत. या कसोटी सामन्यात भारताला आपले आव्हान टिकवायचे असेल तर,उद्या शेवटच्या दिवशी शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा या दोघांना पहिलं सत्र खेळून काढावं लागणार आहे.

तत्पूर्वी इंग्लंडचा कॅप्टन जो रुटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत,धडाकेबाज केलेल्या द्विशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने भारतासमोर ५७८ धावांचा डोंगर उभा केला. जो रुटने सर्वाधिक ३७८ चेंडूत २१८ धावांची खेळी केली. पहिल्या डावात भारताकडून ईशांत आणि नदीम यांनी प्रत्येकी दोन तर बुमरा आणि अश्विनीने प्रत्येकी तीन गडी बाद केले.

पहिल्या डावात भारताची फारच निराशाजनक सुरुवात झाली. रोहित,कोहली, शुभमन,रहाणे हे प्रमुख फलंदाज स्वस्तात बाद झाल्यानंतर,चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत यांनी भारताच्या डावाला आकार दिला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 119 धावांची भागीदारी करत,भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

चेतेश्वर पुजाराने १४३ चेंडूत ७३ धावांची खेळी केली. तर ऋषभ पंतने ८८ चेंडूत ९१ धावांची धडाकेबाज खेळी केली. या खेळात ऋषभ पंतने ९ चौकार, तर पाच उत्तुंग षटकारही लगावले. ऋषभ पंत नंतर अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरनेही आपल्या फलंदाजीचा जलवा दाखवत प्रेक्षकांची मने जिंकली. वॉशिंग्टन सुंदरने नाबाद १३८चेंडूत नाबाद ८५ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने बारा खणखणीत चौकार तर दोन उत्तुंग षटकारही लगावले. भारतीय संघाचा पहिला डाव ३३७ धावात आटोपला.

पाचवा दिवस खेळून काढण्याचं तगडे आव्हान उद्या भारतासमोर असणार आहे. भारताला हा सामना वाचवायचा असेल तर चेतेश्वर पुजारा आणि शुभमन गिल या दोघांना उद्याचं पहिलं सत्र खेळून काढावं,लागणार आहे. मात्र पाचव्या दिवशी खेळपट्टी ही पूर्णतः गोलंदाजांसाठी अनुकूल असणार असल्याने भारतीय फलंदाजांसमोर हे एक मोठे तगडे आव्हान उभं राहिलं आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.