खैराच्या झाडांच्या आेंडक्यांची चेारी करतांना करताना वन पथकाने पकडली चाेरी.
वाडा प्रतिनिधी
वाडा येथील वन परिक्षेत्राचे पथक शुक्रवार दिनांक ०५/०२/२०२१ राेजी रात्री ३.३० च्या सुमारास गस्त घालत असताना वाडा तालुक्यातील
गायगाेटा येथील रस्त्यावर स्कॅीरपीआे गाडी क्रमांक एम एच ०२ ए, पी ८६८० खैराच्या झाडांचे आेंडके भरलेली आढळून आली असता वन पथकाने सदर गाडीला घेरले मात्र अंधाराचा फायदा घेऊन चाेरटे पसार झाले.
वन पथकाने पकडलेल्या गाडीमध्ये खैर जातीचे २० नग १.२२ घन मीटर खैराच्या आेंडक्यांची किमत सुमारे २०,०००/ वीस हजार गाडीची किमत सुमारे २,५००००/ असा सुमारे ३ लाख ५० हजार किमतीचा मुद्देमाल वन पथकाने जमा केला आहे.
सदर चोरी पकडलेल्या पथकामध्ये वन परिक्षेत्र पश्चिम चे अधिकारी एच. बी. सापळे, वनपाल जाधव, वनरक्षक केंदे, माेहिते, निकम, सकपाळ, साेनावने, नदाब, एस. बी. ठाकरे यांचा समावेश होता.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम