आपलं क्षेत्र सोडून इतर गोष्टी बोलताना,सांभाळून बोला;शरद पवार
गेल्या 70 दिवसापासून गाजीपुर दिल्ली बॉर्डरवर लाखो शेतकरी कडाक्याच्या थंडीत आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारने लागू केलेल्या तीनही कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन करत असून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. शेतकऱ्याच्या समर्थनार्थ इंटरनॅशनल कलाकार,खेळाडू उतरल्यानंतर आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये काही दिवसांपासून हे शेतकरी हेडलाईन बनले आहेत.
गेल्या सत्तर दिवसांपासून आत्तापर्यंत शेतकऱ्याच्या आंदोलनावर भारतीय खेळाडू आणि कलाकार काही बोलेले नव्हते. मात्र आंतरराष्ट्रीय गायिका रिहानाने शेतकरी समर्थनार्थ केलेल्या एका ट्विट नंतर अनेक भारतीय खेळाडू,कलाकार विरुद्ध रिहाना असा सामना रंगल्याचे पाहायला मिळाले.
भारतरत्न सचिन तेंडुलकर यानेही या वादात उडी घेत,आमच्या देशाचा हा अंतर्गत विषय आहे असं म्हणत, ‘हैस्टॅग इंडिया टुगेदर’ आणि ‘हैस्टॅग इंडिया प्रपोगंडा’,हा केंद्र सरकारचा हैस्टॅग वापरून ट्विट केलं.
सचिन तेंडुलकरने केलेल्या ट्विट नंतर,त्याच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात टीका झाली. त्याचे पोस्टरही जाळण्यात आले. यापूर्वी शेतकरी आंदोलनाविषयी एकही शब्द न बोलणारा माणूस ‘रीहानाने’ ट्विट केल्यानंतर,तू लगेच केंद्र सरकारने सांगितल्यामुळे तिच्या विरोधात ट्विट करत सुटला,असे गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आले.
सचिन तेंडुलकर,रिहाना यांच्या प्रकरणात आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि देशाचे माजी कृषीमंत्री ‘शरद पवार’ यांनी उडी घेत,सचिन तेंडुलकर यांना चांगलेच फटकारले आहे.
याविषयी माध्यमांनी विचारलेल्या,लता मंगेशकर आणि सचिन तेंडूलकर यांनी शेतकरी प्रश्नाविषयी वेगळी भूमिका घेतली. या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले,त्यांनी जी भूमिका घेतली आहे, त्याविषयी सामान्य माणसामध्ये त्यांच्याविषयीची भावना अतिशय तीव्र व्यक्त झालेली आहे. असं म्हणत शरद पवार यांनी लता मंगेशकर बरोबर सचिन तेंडुलकरलाही फटकारले आहे. हे बोलत असताना शरद पवार सचिन तेंडुलकरचा उल्लेख करायला विसरले नाहीत.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.