भरणे मामाच्या भेटीमुळे भाजपचे दोन ‘सदस्य’ नाराज? ‘राणे’ गटाला मिळण्याची शक्यता

नुकत्याच राज्यातल्या ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या,निकालही हाती आले. २७ जानेवारीला सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाल्यानंतर,खऱ्या अर्थाने सरपंच उपसरपंच पदासाठी रस्सीखेच सुरू असल्याचे राज्यभर दिसून आल्याचे पाहिला मिळाले.

माळशिरस तालुक्यामधील पिंपरी ग्रामपंचायतमध्ये देखील काही दिवसांपासून,काही आश्चर्यकारक घटना घडल्याचे पहिला मिळत आहे. सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आठ ते नऊ फेब्रुवारीला, सरपंच पदाची निवड केली जाणार असल्याची माहिती दिल्यानंतर खऱ्या अर्थाने सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आल्याचे दिसून आले.

काही दिवसांपूर्वी भाजपचे तालुक्याचे आमदार ‘राम सातपुते’ यांनी पिंपरी गावाला भेट देऊन नुतन सदस्यांचा सत्कार केला, त्याच बरोबर रखडलेली विकासकामे मार्गी लावू,असे आश्वासनही दिले. राम सातपुते यांच्या भेटीनंतर पिंपरी ग्रामपंचायतीवर भाजपाची सत्ता येणार हे जवळपास निश्चित झालं असल्याचं,गावातल्या ज्येष्ठांकडून सांगण्यात आलं.

परंतु जसजसे दिवस जाऊ लागले, तसतशी सत्तेची समीकरणे बदलू लागली. ‘राणे’ गटाने केलेल्या हालचालीमुळे पिंपरी ग्रामपंचायतीच्या राजकारणात आणखी ‘ट्विस्ट’ बाकी असल्याचं दिसून आलं. त्यातच एकनाथ कर्चे,राजेश कर्चे यांनी ‘दत्ता मामा भरणे’ यांची घेतलेली भेट ही,नवीन राजकीय समीकरणे ठरवणारी भेट होती,असं गावातील नागरिकांकडून सांगण्यात आलं.

एकनाथ कर्चे आणि राजेश कर्चे यांच्याच गटातील भाजपचे दोन पदाधिकारी हे पिंपरी ग्रामपंचायतीचे नुतन सदस्य आहेत. ‘हनुमंत श्रीरंग कर्चे’ हे भाजपचे सांगोला तालुक्याचे विस्तारत आहेत. त्यांच्याच पत्नी रुक्मिणी हनुमंत कर्चे यांची ग्रामपंचायत ‘सदस्य’ म्हणून निवड झाली आहे. त्याचबरोबर नूतन सदस्या ‘संगीता हनुमान शिंदे’ या भाजपच्या तालुका महिला अध्यक्षा आहेत. त्यामुळे पिंपरी ग्रामपंचायतीवर भाजपची ‘सत्ता’ यावी ही या दोघांची प्रबळ इच्छा ‘लपून’ राहिलेली नाही. अशातच या दोघांचे ‘पॅनल प्रमुख’ एकनाथ कर्चे आणि राजेश कर्चे यांनी राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांची भेट घेतल्याने भाजपचे हे दोन निष्ठावंत प्रचंड नाराज असल्याचं गावात बोललं जातंय.

https://www.instagram.com/p/CK00dzdDCR2/?igshid=ffe29e84bs02

भाजपचे दोन निष्ठावंत हनुमंत श्रीरंग कर्चे आणि हनुमंत शिवाजी शिंदे या दोघांना पिंपरी ग्रामपंचायतीवर ‘राष्ट्रवादीची’ सत्ता आल्यास कधीही सहन होणार नाही. आपल्या विचारधारेशी ते कधीही तडजोड करणार नाहीत. अनेक वर्षांपासून आम्ही या दोघांची भाजपा विषयी असणारी ‘निष्ठा’ जवळून पाहिली आहे. असं गावातील अनेक ज्येष्ठ मंडळींचं सांगितलं आहे. त्यामुळे आता पिंपरी ग्रामपंचायतीच्या राजकारणाला नवी कलाटणी मिळणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

दुसरीकडे ‘मारुती राणे’ गटानेही पिंपरी ग्रामपंचायत सत्ता स्थापनेबाबत जोर लावल्याचे दिसून येत आहे. मारुती राणे हे खऱ्या अर्थाने या वर्षी पिंपरी ग्रामपंचायतीचे ‘किंग मेकर’ असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येतंय. स्वतःचा ‘वार्ड क्र.एक’ हा मतदारसंघ बिनविरोध करून ‘एकनाथ कर्चे’ यांच्या पारंपरिक समजल्या जाणाऱ्या ‘वार्ड क्रमांक3’ मध्ये ‘दोन सदस्य’ निवडून आणण्याची किमया राणे गटाने करून दाखवली असं स्थानिकांनी सांगितलं.

स्थानिक पुढे म्हणाले, एकनाथ कर्चे यांचा ‘वार्ड क्रमांक तीन’ हा पारंपरिक मतदार संघ आहे. या वॉर्डात एकनाथ कर्चे यांच्या विरोधात जिंकणे म्हणजे अशक्यप्राय आव्हान असतं. एकनाथ कर्चे यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचं काम मारुती राणे गटाने करुन एक नवीन इतिहास रचल्याचं स्थानिकांनी सांगितलं. आता यापुढे या मतदारसंघात राणे गटाचा बोलबाला चालणार असल्याचही स्थानिकांनी सांगितले.

वार्ड क्रमांक१’चे’, दोन बिनविरोध सदस्य, वार्ड क्रमांक तीन मधील दोन सदस्य, आणि भाजपाचे नाराज असलेले दोन सदस्य,असे एकूण सहा सदस्य राणे गटाकडे असल्याची चर्चा गावांमध्ये रंगू लागली असून,मारुती राणे यांचा गट ग्रामपंचायत पिंपरीवर, आपली सत्ता स्थापन करू शकतो,असं गावात बोललं जातंय.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.