आम्ही तीनही राजे एकच आहोत

0

मराठा आरक्षणासोबत कष्टकऱ्यांचा लढ्यासाठी सतत झटणारे माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी नुकतीच अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनची स्थापना केली आहे. या फाऊंडेशनच्या माध्यमातून नरेंद्र पाटील हे मराठा आरक्षणासोबतच कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी लढणार आहेत. भाजपा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते या फाऊंडेशनचे सातारा येथे नुकतेच उद्धाटन करण्यात आले आहे. या कार्यक्रमावेळी उद्घाटन समारंभाला खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले उपस्थित होते.

साताऱ्यातील या कार्यक्रमाला छत्रपती संभाजीराजे आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले एकत्र आले होते, तिन्ही राजे एकत्र येणार का? हा असा प्रश्न खासदार संभाजीराजे यांना विचारला असता, आम्ही तीनही राजे एकत्रच आहोत, आमच्या तिघांची भूमिका एकच  आहे, मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, सातारा आणि कोल्हापूर या गाद्या वेगवेगळ्या नाहीत आम्ही सगळे एकत्र आहोत, त्यामुळे एकत्र येण्याचा प्रश्नच नाही असं म्हणत त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला बगल दिली. ते पुण्यामध्ये बोलत होते.

मराठा आरक्षणासाठी राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन सुरू आहेत, मराठा आरक्षण विषय न्यायप्रविष्ठ आहे, ५ फेब्रुवारीला मराठा आरक्षणावरती सुनावणी होणार आहे, या सुनावणीमध्ये काय होईल हे पाहणं महत्वाचं असेल.५ फेब्रुवारीपर्यंत निर्णय काय येईल हे पाहणं आवश्यक आहे. संभाजीनगर ला मी जाणार होतो, मात्र काही कारणास्तव मला त्याठिकाणी जाता आले नाही. आंदोलन मागे घेतलं गेले नसेल तर मागे घ्यावं अशी मी विनंती करतोय, असं संभाजीराजे म्हणाले आहेत.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.