सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या ‘सरपंचांची’ निवड होणार’या’ दिवशी!

महाराष्ट्रातील मुदत संपणाऱ्या एकूण 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे मतदान 15 जानेवारीला झाल्यानंतर 18 जानेवारीला निकाल लागला. मतदान झाल्यानंतर निकाल कधी लागतो, याची उत्सुकता संपली खरी. मात्र त्यानंतर सरपंचांचे आरक्षण कोणत्या प्रवर्गाचे लागते? याकडे निवडून आलेल्या उमेदवारांचे लक्ष होतं, सरपंचाच्या आरक्षणाची प्रतीक्षा संपल्यानंतर आता निवडून आलेल्या उमेदवारांचे आणि गावातील सर्व मतदारांचेही सरपंच निवडीकडे लक्ष लागून राहिले आहे.

निकाल लागल्यानंतर 30 दिवसाच्या आत सरपंच निवडणे बंधनकारक आहे. 28 फेब्रुवारीपर्यंत राज्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडीची प्रक्रिया पार पडणार आहे. मात्र सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी 8 फेब्रुवारीलाच सरपंच निवडीचे आदेश दिले,असल्याची माहिती त्यांनी स्वतः मिडीयाशी बोलताना दिली आहे. यासंबंधीचा आदेश सोमवारी काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

ग्रामपंचायतीचे निकाल लागल्यानंतर सरपंच आरक्षणाची प्रतीक्षा संपली. आता सरपंच कोण होणार? ही प्रतीक्षा लागून राहिली आहे. आता ही प्रतीक्षा देखील आठ फेब्रुवारीला संपणार असल्याचे अखेर शिक्कामोर्तब झालं आहे. सोलापूर जिल्ह्यातील 658 ग्रामपंचायतीच्या सरपंचांची निवड एकाच दिवशी म्हणजे आठ फेब्रुवारीला होणार आहे. काही टेक्निकल अडचण आली तर, 9 फेब्रुवारी होईल असही मिलिंद शंभरकर मीडियाशी बोलताना म्हणाले. याचा अर्थ जिल्ह्यातील 658 ग्रामपंचायतींच्या सरपंच निवडीचा कार्यक्रम आठ किंवा नऊ फेब्रुवारीला पार पडणार असल्याचे स्पष्ट आहे.

सरपंच निवड होण्याअगोदर तीन दिवस संबंधितांना नोटीस दिली जाणार आहे. नोटीस देऊन तीन दिवस झाल्यानंतर चौथ्या दिवशी सरपंच निवड केली जाणार आहे. अर्ज भरणे,माघार घेणे आणि सरपंच निवड हा कार्यक्रम एकाच दिवशी पार पडणार असल्याचं मिलिंद शंभरकर यांनी मीडियाशी बोलताना म्हटलं आहे. याच बरोबर सरपंच निवड झाल्यानंतर 18 फेब्रुवारी पूर्वी पहिली ग्रामसभा घेणे, निवडून आलेल्या सदस्य आणि सरपंचांना बंधनकारक असणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.