असे येडे बरळतच असतात..’; संजय राऊत संतापले

शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांचा  महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या विषयावरून  खुरपुस असा समाचार घेतला आहे.  संजय राऊत म्हणाले, ‘असले येडे बरळतच असतात. या येड्यानी जरा महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नाचा अभ्यास करावा’ असा टोला देखील सवदी यांना  संजय राऊत यांनी लगावला आहे.

काल  ‘बेळगाव सोडा, मुंबईदेखील कर्नाटकचा भाग आहे,’ असे व्यक्तव्य कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी केले होते. यावर संजय राऊत यांनी सवदी यांचा खूरपुस समाचार घेतला  आहे. संजय  राऊत म्हणाले की, “असे येडे बरळतच असतात. सवदी यांनी  महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नावर  अभ्यास करावा”.

पुढे बोलत असताना संजय राऊत म्हणाले “काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी जे सागंतिलं तेच योग्य आहे. हा केवळ कर्नाटकचाच प्रश्न नाही तर हा दोन राज्यांच्या सीमांचा प्रश्न आहे. त्यामुळे कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी  इतिहास समजून घेतला पाहिजे. अभ्यास केला पाहिजे ” असेही राऊत म्हणाले.

पुढे  राऊत म्हणाले, “बेळगावमध्ये मराठीला  काय स्थान आहे? असे प्रश्न  करतानाच कानडी लोकांना आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर जायला सांगत नाही. आम्ही  कर्नाटक व्याप्त भाग महाराष्ट्रात यावा असं सांगत आहोत. मुंबईमध्ये असणाऱ्या कानडींवर आम्ही कोणतीही सक्ती केली नाही. त्यांना पूर्णपणे स्वातंत्र्य दिले गेले आहे.” असे देखील राऊत यांनी स्पष्ट केले.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.