आता नारायण राणे यांना सुखानं झोप लागेल – शरद पवार

राज्य सरकारने सुरक्षा व्यवस्था कमी केली असली तरी केंद्र शासनाने सुरक्षा व्यवस्था दिली  आहे, असे नारायण राणे यांनी म्हणाले  होते. नारायण राणे यांच्या टोल्याला प्रतिउत्तर देत असताना  त्यावर शरद पवार म्हणाले केंद्राच्या सुरक्षा व्यवस्थेमुळे तरी राणेंना सुखाने झोप लागेल. शरद पवार हे कोल्हापूर मध्ये पत्रकारांशी बोलत होते.

राजकीय नेते आणि त्यांना दिली  जाणारी सुरक्षा हा एक  वादाचा विषय ठरत आहे. सध्या  राज्य सरकारने देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, नारायण राणे, राज ठाकरे या नेत्यांसह इतरांची सुरक्षा व्यवस्था कमी केली आली आहे. यावरून नवीन वादाला तोंड फुटले आहे.

याबाबत बोलत असताना  शरद पवार म्हणाले, कायदा-सुव्यवस्था याचा अभ्यासपूर्ण विचार करून कोणाला किती सुरक्षा पुरवायची याचा निर्णय राज्य शासन घेत असते. याबाबत राज्य शासनाकडून निर्णय घेतला आहे मात्र यामध्ये केंद्र शासनाने  हस्तक्षेप करून पुन्हा नव्याने सुरक्षा दिली आहे; ही पद्धत अयोग्य आहे, अस शरद पवार म्हणाले. माझीदेखील सुरक्षा व्यवस्था कमी केली गेली होती परंतु याबाबत  आपण कुठलीच प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हते.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.