कोरोना लस बनवणाऱ्या सीरम इन्सिट्यूटच्या आगीमागे घातपात? ५ जण मृत्युमुखी; उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर; म्हणाले…

0


पुण्यामध्ये असणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेली आग नियंत्रणात आल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. मुंबईमध्ये आयोजित केल्या गेलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना उद्धव ठाकरे म्हणाले  की, “देशातील लसीकरण मोहिमेमध्ये सीरमचा खूप महत्वाचा  वाटा असून त्याच संस्थेत आग लागली आहे. मिळालेल्या  माहितीनुसार कोव्हिडची लस तयार करणाऱ्या विभागाला आग लागलेली नाही. बीसीजी लस तयार केली जाते त्या ठिकाणी आग लागली होती. ही आग आटोक्यात आली असून एकूण सहा जणांना बाहेर काढण्यात यश मिळाले आहे”.

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये झालेल्या आगीमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे महानगरपालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रसारमाध्यांशी बोलत असताना ही माहिती दिली आहे. मृत्यू झालेल्यांपैकी बांधकाम मजूर असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. “आग लागलेल्या ठिकाणी कोव्हिशिल्ड लसीची  निर्मिती किंवा साठवणूक होत नव्हती. पूर्णपणे दुसऱ्या ठिकाणी हे  काम सुरु होतं. परंतु या ठिकाणी दुर्दैवाने पाच जणांना जीव गमवावा लागला असल्याचं,” महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.