पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये भीषण आग
करोना प्रतिबंधक ‘कोव्हिशिल्ड’ लसीमुळे चर्चेत असणाऱ्या पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये भीषण आग लागली आहे. सीरम इन्स्टिट्यूटमधील इमारतीच्या तिसर्या मजल्यावर ही आग लागल्याचे पाहायला मिळत आहे. घटनास्थळी तत्काळ अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल झाल्या आहेत. आग विझवण्यासाठी अटोकाट प्रयत्न सुरु आहेत. अग्निशमन दलाचे काही वरिष्ठ अधिकारीदेखील घटनास्थळी रवाना झाले आहेत.
कोव्हिशिल्ड लसीच्या वापरासाठी परवानगी दिली गेली आहे. सध्या देशभरामध्ये लसीकरणास चालू आहे. मांजरी येथील या ठिकाणी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी घेतली जाणारी बीसीजी लस निर्माण करण्याचे काम सुरू आहे . सर्वात महत्वाचं म्हणजे करोनावरील ‘कोव्हिशिल्ड’ लस तयार केली जाते त्या ठिकाणाहून हा भाग काही अंतरावर आहे. अद्याप आगीची झळ तिथंपर्यंत पोहोचलेली नाही. आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मोठ्या प्रमाणात आगीचे लोट पाहायला मिळत आहेत. घटनास्थळी लोकांनी प्रचंड गर्दी केली आहे.
पुणे महानगर पालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी एबीपी माझाशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, “ सिरम इन्सिट्यूटच्या एका इमारतीला आग लागली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आणि प्रमुख अधिकारी हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही”. आग्निशमन दल आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असून इमारतीत कोणते कर्मचारी अडकले आहेत का ? याचीही पाहणी करत आहेत. आजुबाजूला लोकवस्ती असल् यामुळे आगीची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली आहे. मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक देखील झाली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम