भाजपाने नाक घासून महाराष्ट्राची माफी मागितली, तरी या पापामधून मुक्ती मिळणार नाही.

नुकत्याच शिवसेनेमध्ये दाखल झालेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि कंगना रणौत या दोघींमध्ये नविन वर्षाच्या सुरूवातीलाच वादाला सुरुवात झाली. उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी ऑफिससाठी नवीन जागा विकत घेतली आहे. कंगना राणावत ने याच मुद्द्यावर उर्मिला मातोंडकर यांच्यावर टीका केली होती. कंगनाच्या याच ट्विटवर बोट ठेवत  भाजपावर या  निशाणा साधला आहे.

“भाजपाला पाठिंबा दिल्याने मला काहीच मिळाले नाही. परंतू उर्मिला मातोंडकर यांना काँग्रेसमुळे खूप फायदा झाला आहे,” असा मजकूर असलेले ट्विट  कंगनाने केलं होतं.  त्यावरून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी कंगनाला प्रतिउत्तर दिले . “खरंच, भारतीय जनता पार्टीला खूश करून… भाजपाला खूश करण्यासाठी महाराष्ट्र, मुंबई पोलीस आणि मुख्यमंत्र्यांची बदनामी करण्यात आली. महाराष्ट्र भाजपा आणि भाजपाचं हे फार मोठे षडयंत्र होतं, याची हा कबूलीच कंगना राणावतने दिली आहे. भाजपाने नाक घासून महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली, तरी या पापामधून भाजपला सुटका मिळणार नाही,” अशी टीका सावंत यांनी केली आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.