औरंगाबादचा एक इतिहास आहे, ज्यांनी या गावावर विजय मिळवला त्यांनी तिथलं नाव बदललं.
साधारण ऐंशीचं दशक होते. महाराष्ट्रातीमध्ये राजकीय पातळीवर बऱ्याच घडामोडी घडत होत्या. महाराष्ट्र राज्याने १९८० ते १९८५ या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये ४ वेगवेगळे मुख्यमंत्री पाहिले होते. कॉंग्रेसमधील नेते एकमेकांवर नाखूष होते. वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडून कॉंग्रेस पक्षातून बाहेर पडलेले शरद पवार हे विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी सांभाळत होते. भारतीय जनता पार्टीचे अजून बस्तान बसायचं होतं. इतर पक्ष अंतर्गत कलहामुळे व नियोजन शून्य कारभारामुळे खचले गेले होते.
महाराष्ट्रामध्ये कॉंग्रेस पक्षाला बळकट करण्यासाठी पंतप्रधान राजीव गांधी यांनी निर्णय घेतला की काहीही झाले तरी शरद पवारांना काँग्रेस पक्षात परत आणायचं.
औरंगाबाद मध्ये राजीव गांधी यांच्या उपस्थिती मध्ये सभा झाली. त्या सभेला राजीव गांधी यांच्या शेजारी बसलेल्या शरद पवारांना पाहून मराठवाड्यातला तरुण कार्यकर्ता प्रचंड नाराज झाला. कारण कॉंग्रेस पक्षाला पर्याय म्हणून मराठवाड्यातील जनता शरद पवारांना मराठवाड्याने ताकद दिली होती. ज्या गांधी घराण्याच्या विरोधामध्ये व कॉंग्रेसच्या विरोधात पवारांनी शिव्या दिल्या आज त्यांच्याच सोबत जाव लागणार हे काही मराठवाड्याला रुचलं नव्हतं.
शरद पवार यांनी घेतलेल्या निर्णयामुळे मराठवाड्यातील जनता सैरभैर झाली. याच सैरभैर झालेल्या युवकांनी नवीन पर्याय निवडला, तो म्हणजे “शिवसेना”. तेथील तरुणांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत जाण्याच्या निर्णय घेतला. या
अगोदर शिवसेना पक्षाची ताकद ही फक्त मुंबई व ठाणे या ठिकाणीच होती.
त्या वेळी शिवसेना पक्षाची एकच शाखा मुंबईच्या बाहेर शाखा होती ती देखील औरंगाबाद मध्येच. या कालखंडामध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी एक निर्णय घेतला होता की, महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपर्यामध्ये शिवसेना पक्षाला पोहचवायचं. प्रत्येक जिल्ह्यामध्ये संपर्कप्रमुख नेमण्यात आला होता.
बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी घोषणाच जाहीर केली होती ती म्हणजे “गाव तिथे शाखा, घर तिथे सैनिक ! “
शरद पवारांनी केलेल्या कॉंग्रेस प्रवेशामुळे शिवसेना पक्षाला फायदा झाला. पवारांवर दुखावले गेलेले सर्व कार्यकर्ते हळूहळू शिवसेनेमध्ये प्रवेश करू लागले. शिवसेना पक्षाने स्वीकारलेला जहाल हिंदुत्वाचा अवतार जनतेला आकर्षित करत होता. छगन भुजबळ आणि दादा कोंडके यांच्या सोबतीमुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तृत्वाची मोहिनी ग्रामीण तरुणांवर पडली होती.
सन १९८७ च्या सुरुवातीपासूनच आणि नांदेड व लातूर सोडले तर मराठवाड्यामधील प्रत्येक गावाच्या वेशीवर शिवसेना पक्ष आपले जाळे तयार करत होता. गावागावामध्ये शिवसेनेच्या शाखेच उद्घाटन होत होते.
महत्वाचे म्हणजे त्याच वर्षी झालेल्या औरंगाबाद मधील २१६ ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये ४५ जागी शिवसेना पक्षाचा भगवा फडकला होता.
या काळामध्ये भारतीय जनता पक्षाने देखील अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला आपली हिंदुत्वाची भूमिका जहाल करण्याचा निर्णय घेतला. याच काळात भाजपाने शिवसेनेसोबत युती सुद्धा झाली. भाजपचे प्रमोद महाजन बाळासाहेब ठाकरे यांच्या मराठवाड्यामधील सभा गाजवू लागले. राम मन्दिरासारखे प्रकरण तापू लागले होते.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.