दिनदर्शिका प्रकाशनाला मा. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची उपस्थिती!

शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे आपल्या कार्यकर्त्यांमध्ये तसेच जनतेत प्रचंड लोकप्रिय असल्याचे दिसून येते. शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीच्या तिकिटावर अमोल कोल्हे यांनी लोकसभेची निवडणूक लढवली. आणि शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांना पराभव केला. 2019 च्या लोकसभेत शिवाजीराव पाटील यांचा जरी पराभव झाला असला तरी, ते खचले नाहीत. जनतेच्या प्रश्नांसाठी ते काम करत असल्याचे दिसून येते. कार्यकर्ते, जनता आणि त्यांच्यामधला संपर्क त्यांनी अधिक दृढ केल्याचे विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून दिसून येत असून येणाऱ्या अनेक निवडणुकांमध्ये त्यांना ‘या’ साऱ्या गोष्टींचा नक्कीच फायदा होईल असं बोललं जातयं.

नुकतेच, ओतूर – मांडवी किनारा नागरी सहकारी पतसंस्था ओतूर, त्याचबरोबर मोनिका महिला नागरी सहकारी पतसंस्था ओतूर,यांच्या वतीने छापण्यात आलेल्या दिनदर्शिका २०२१ चे प्रकाशन मा.खासदार शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते निवासस्थानी लांडेवाडी, ता. आंबेगाव येथे संपन्न झाले.

या कार्यक्रमाला जुन्नर तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी पतसंस्थेचे संस्थापक-अध्यक्ष, शिवसेना जिल्हा सल्लागार संभाजीराव तांबे, जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दिलीप डुंबरे, उपतालुकाप्रमुख धनजंय डुंबरे आदी मान्यवर उपस्थित होते.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.